Maratha Reservation | सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुनच राजकीय नेत्यांमध्येच दोन गट पडल्याचे दिसत आहे. एकाबाजूने छगन भुजबळ मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला कडाडून विरोध करत आहेत, त्याचवेळी दुसऱ्याबाजूने मराठा नेते भुजबळांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी राज्य सरकारने मागच्या आठवड्यात मान्य केली. कुणबी नोंद सापडणाऱ्या कुटुंबालाच नव्हे, तर त्याच्या सग्या-सोयऱ्यांना आरक्षण देण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य केली आहे. त्यानंतर आता छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एकवटत आहेत. आरक्षणावरुन मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी बांधव आमचे भाऊ आहेत, हे राजकीय नेतेच भांडण लावण्याचा प्रयत्न करतात अस म्हटलय.
दरम्यान भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या समाजसेविका अंजली दमानिया यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला आहे. ‘भुजबळ भाजपच्या वाटेवर? आहेत का?’ असा प्रश्न त्यांनी X वर विचारलाय. “एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? असा त्यांचा सवाल आहे. अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप” अशा बोचऱ्या शब्दात अंजली दमानिया यांनी भाजपावर टीका केली आहे. अंजली दमानिया यांनी याआधी सुद्धा अनेकदा छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची प्रकरण लावून धरली होती.
भुजबळ भाजप च्या वाटेवर?
एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार?
अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी?
कुठे फेडाल हे पाप
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 1, 2024
‘छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ घाला’, असं कोणी म्हटलं?
दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ मारून त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, असं आवाहन संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं आहे.