मुंबई : भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला असून, त्याच अहंकाराच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर आहे, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्र महामंथन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात शिवसेना खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक सहभागी झाले होते.
अरविंद सावंत काय म्हणाले?
भाजपची वेळ वाईट आली आहे, त्यामुळे ते शिवसेनेला टाळी देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण 2014 मध्ये युतीत खोडा घालणारे कोण होतं, ते त्यांनी शोधावं, असे म्हणत अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच, शिवसेना कुणाच्या बाजूने नाही, तर सत्याच्या बाजूने आहे, असेही अरविंद सावंत म्हणाले.
“नमो की रागा , 10 पैकी कुणाला किती गुण द्याल?” असा प्रश्न अरविंद सावंत यांना विचारला असता, ते म्हणाले, “कुणालाच नाही. कारण ज्याला सोनं म्हटलं ते पितळ निघालं, ज्याला पितळ समजलं ते कधीही सोनं होईल की नाही माहित नाही.”
यावेळी, शिवसेनेच्या तारेवरच्या कसरतीचं कौतुक, सत्तेतही राहायचं आणि विरोधही करायचा, असा टोमणा जयंत पाटील यांनी अरविंद सावंत यांना लगावला असता, “तारेवरची कसरत आम्ही राष्ट्रवादीकडूनच शिकलो”, असे उत्तर अरविंद सावंत यांनी दिले.
आणखी महत्त्वाचे मुद्दे :