मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. बॉलिवूडमधील लोकांकडून खंडणी वसुली, लाचखोरी आणि बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोपाचा त्यात समावेश आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांना स्वत: समीर वानखेडे, त्यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि बहीण यास्मिन वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे. त्यानंतर आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही या आरोपांवरुन नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधलाय. (Chitra Wagh criticizes Nawab Malik and MP Sanjay Raut over allegations against Sameer Wankhede)
“तुम्ही…त्याला धमक्या दिल्या, त्याला अपमानीत केलं, त्याच्या पत्नीला शिव्या दिल्या, त्याच्या बहिणीवर आरोप केले, त्याच्या आई-वडीलाना बदनाम केलं, त्याचा जात धर्म काढला… तरीही तो डगमगला नाही, कर्तव्य बजावत राहीला… तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला” असं ट्वीट करुन चित्रा वाघ यांनी समीर वानखेडे यांच्यावरील आरोपींवर नवाब मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
तुम्ही…
त्याला धमक्या दिल्या
त्याला अपमानीत केलं
त्याच्या पत्नीला शिव्या दिल्या
त्याच्या बहिणीवर आरोप केले
त्याच्या आई-वडीलाना बदनाम केलं
त्याचा जात धर्म काढलातरीही तो डगमगला नाही
कर्तव्य बजावत राहीलातुम्ही करा रे कितीही हल्ला
लय मजबूत भिमाचा किल्ला#ISupportSameerWakhende— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 26, 2021
दरम्यान, चित्रा वाघ यांनी ट्विटरवर आपला एक व्हिडीओ पोस्ट करुन मी क्रांती रेडकर सोबत असल्याचं जाहीर केलंय. “आर्यन खानच्या पाठीशी बॉलिवूडसह सरकार उभं राहिलं, तर जीव धोक्यात घालणाऱ्या समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्यावर अभद्र भाषेत टीका सुरू आहे,” असा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय. तसेच मी महिला म्हणून अभिनेत्री क्रांती रेडकरसोबत आहे, असंही त्यांनी जाहीर केलं.
चित्रा वाघ म्हणाल्या, “काय जमाना आहे, आर्यन खानच्या पाठीशी बॅालिवूडसह सरकार उभं राहिलं, तर जीव धोक्यात घालणाऱ्या समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्यावर अभद्र भाषेत टीका सुरू आहे. जेव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं. क्रांती, महिला म्हणून मी तुझ्यासोबत आहे.”
‘सर्वज्ञानी जनाब संजय जी राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे ?? न्यायालयीन प्रकरणावर अशा गलीच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करते. जय हिंद..’ असंही एक ट्वीट चित्रा वाघ यांनी केलंय.
सर्वज्ञानी जनाब संजय जी राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे ??
न्यायालयीन प्रकरणावर अशा गलीच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करते
जय हिंद.. pic.twitter.com/xfYTas4u0b— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 26, 2021
इतर बातम्या :
तपास अधिकाऱ्याची जात, धर्म काढणं दुर्दैवी; NCB चा वापर राजकीय दबावासाठी का होईल? फडणवीसांचा सवाल
Chitra Wagh criticizes Nawab Malik and MP Sanjay Raut over allegations against Sameer Wankhede