सभागृहाने केलेल्या निलंबनाची सुनावणी सभागृह सुरु नसताना कशाला?-आशिष शेलार

| Updated on: Jan 10, 2022 | 10:08 PM

12 आमदारांना 1 वर्षांसाठी निंलबित करण्यात आले असून हे निलंबन अन्यायकारक असल्याचे सांगत या विरोधात भाजपा नेते आमदार आशिष शेलार आणि अन्य 11 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली असून ती प्रलंबित आहे.

सभागृहाने केलेल्या निलंबनाची सुनावणी सभागृह सुरु नसताना कशाला?-आशिष शेलार
12 आमदारांना विधानसभेत प्रवेश द्या, आशिष शेलारांचं विधानभवन सचिवांना पत्र
Follow us on

मुंबई : निलंबन प्रकरणी विधानसभा उपाध्यक्षांच्या सुनावणीला आम्ही आज 6 आमदार 12 आमदारांच्यावतीने उपस्थिती राहिलो. आमचे निवेदन लेखी स्वरुपात आम्ही दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार सदर निलंबन हे सभागृहाने केले असल्याने सभागृह सुरु नसताना सुनावणीचा काय उपयोग, हेही आम्ही उपाध्यक्षांच्या लक्षात आणून दिले, अशी माहिती भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली.

नरहरी झिरवळ यांच्यापुढे सुनावणी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या 12 आमदारांना 1 वर्षांसाठी निंलबित करण्यात आले असून हे निलंबन अन्यायकारक असल्याचे सांगत या विरोधात भाजपा नेते आमदार आशिष शेलार आणि अन्य 11 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली असून ती प्रलंबित आहे. त्यावर येत्या दोन दिवसात सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी अपेक्षित आहे. असेही ते म्हणाले. दरम्यान, आज या प्रकरणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानभवनात आपल्या कार्यालयात सुनावणी ठेवली होती. त्याला 12 आमदारांच्यावतीने 6 आमदार उपस्थितीत होते. यामध्ये आमदार आशिष शेलार, जयकुमार रावल, योगेश सागर, अँड पराग अळवणी, नारायण कुचे, अभिमन्यू पवार आदींचा समावेश होता.

दरम्यान, याबाबत मिडियाला माहिती देताना आमदारआशिष शेलार म्हणाले की, विधानसभा उपाध्ययक्षांनी आम्हाला सुनावणीसाठी आज बोलावले होते. सन्मानाने आम्हाला बोलावले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. 12 आमदारांच्यावतीने आम्ही 6 आमदार उपस्थितीत होतो. आमचे कायदेशीर म्हणणे आम्ही लेखी स्वरूपात विधानमंडळ सचिवालयाला आणि उपाध्यक्षांना दिले आहे. आमची कोणतीही चुक नसताना आमच्यावर एक वर्षांची निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यावेळी आमचे म्हणणेही ऐकून घेण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो ती याचिका प्रलंबित आहे. त्यावर येत्या दोन दिवसात सुनावणी अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार सदर निलंबन हे सभागृहाने केले असल्याने सभागृह सुरु नसताना सुनावणीचा काय उपयोग,हे आम्ही उपाध्यक्षांच्या लक्षात आणून दिले, अशी माहिती भाजपा नेते आमदारआशिष शेलार यांनी दिली.

Covid Test : घरीच करा कोव्हिड चाचणी, सेल्फ टेस्टिंग कीट आता ऑनलाइन उपलब्ध

संरक्षण मंत्र्यांपाठोपाठ भाजपाध्यक्षही कोरोना पॉझिटिव्ह! संपर्कातील लोकांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन

Mumbai Crime : अभिनेत्रीचे न्यूड फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टरला अटक