राज्यात फक्त ‘काय’द्यायचे राज्य आहे का?; आशिष शेलार यांचा सवाल

| Updated on: Aug 06, 2021 | 10:56 AM

राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि अनागोंदी कारभारावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यात फक्त काय द्यायचे राज्य आहे का? (Ashish Shelar)

राज्यात फक्त कायद्यायचे राज्य आहे का?; आशिष शेलार यांचा सवाल
Ashish Shelar
Follow us on

मुंबई: राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि अनागोंदी कारभारावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यात फक्त काय द्यायचे राज्य आहे का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. (ashish shelar criticize maharashtra government over various issues)

आशिष शेलार यांनी एकामागोमाग तीन ट्विट करत सरकारविरोधात जोरदार हल्ला चढवला आहे. सरकार विरोधात लिहिले म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडण्यात आला. मंत्र्यांना प्रश्न विचारले तर ठाण्याच्या करमुसे सारख्यांना जीव जाईपर्यंत मारले. आमदारांनी विधानसभेत ओबीसी विषयावर खडा सवाल केला तर आमदारांना निलंबित केले, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

दाऊदची गँग चालवताय?

राज्यपाल आणि विरोधीपक्ष नेते अडचणीत असलेल्या जनतेला भेटायला गेले तर सरकारच्या पोटात कळ येते. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप असलेल्या पोलीस बदल्या भ्रष्टाचार प्रकरणातील कागदपत्रे सीबीआयला राज्य सरकार देत नाही. न्यायालयाचे आदेशही मानत नाही. देशमुख प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्तांनीच चक्क सीबीआयच्या अधिकाऱ्याला धमकावले. राज्यात फक्त आणि फक्त काय”द्यायचे” राज्य आहे का? तिघाडी मिळून सरकार चालवताय की दाऊदची गँग चालवताय?, असा घणाघाती हल्ला शेलार यांनी सरकारवर चढवला आहे.

मुख्यमंत्र्यांवर टीका

दरम्यान, कालच शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केली होती. काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिका कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यावरून शेलार यांनी टीका केली होती. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून गेले 3 महिने जी वास्तू वापरात आहे त्या वास्तुचे उद्घाटन आज (5 ऑगस्ट) करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची फसगत झाली आणि कार्यक्रमाचं हसं झालं. असा प्रकारचं दुर्दैवी वर्तन मुंबई महापालिकेने का करुन दाखवले?, असा सवाल शेलार यांनी केला होता. जुनी वास्तु अपुरी पडत असल्याने स्थानिक आमदार म्हणून मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तत्कालीन महापौर, पालिका आयुक्त, पालिका प्रशासनाकडे गेले 6 वर्षे सतत पाठपुरावा केला. या कामात स्थानिक नागरिक, स्थानिक संस्था यांनीही मोठा पाठपुरावा केला आहे. या कार्यालयाचा ठराव मांडून त्यासाठी निधी उपलब्धतेच्या बैठका, त्याचे टेंडर, प्रत्यक्ष काम व त्यामध्ये आलेल्या अडचणी याबाबत 8 वेळा बैठका घेतल्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (ashish shelar criticize maharashtra government over various issues)

 

संबंधित बातम्या:

केंद्रीय मंत्रिमंडळाचा अर्धवट निर्णय, 50 टक्क्यांच्या मर्यादेवर 102 वी घटनादुरुस्ती निरुपयोगी : संजय राऊत

घटनात्मक पेचप्रसंग राजभवनातच, त्यांचे बोलविते धनी कोण?; संजय राऊत यांचा सवाल

Maharashtra News LIVE Update | “महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा दौरा पेगसस स्पायवेअर संदर्भात होता का?”

(ashish shelar criticize maharashtra government over various issues)