मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court of India) सीबीआयला (CBI) एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी ‘भाजप सरकारच्या काळातची सीबीआयची अवस्था पानटपरी सारखी झालीय’ असा हल्लाबोल भाजपवर केला आहे. (Aslam Shaikh said under the BJP Govt, CBI has become like a pan shop)
‘सीबीआय भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात जाऊन कुणावरही गुन्हा दाखल करते. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही, तिथल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर कारवाई केली जाते. हे फक्त भाजपची सत्ता नसणाऱ्या राज्यांमध्येच होते. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्ण्याचे स्वागत करतो”, असं अस्लम शेख यांनी सांगितले.
Under the BJP govt, CBI has become like a pan shop. It goes anywhere & books anyone, particularly in non-BJP ruled states. It took action against CMs & ministers. We welcome the court’s ruling: Maharashtra Minister Aslam Sheikh on SC saying state’s consent is a must for CBI probe pic.twitter.com/BbbfNAmZOe
— ANI (@ANI) November 19, 2020
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (CBI) कोणत्याही राज्यात चौकशी करण्यासाठी संबंधित राज्याची परवानगी आवश्यक असेल, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. भारतीय राज्यघटनेतील तशी तरतूद आहे. ही तरतूद संविधानातील संघराज्याच्या नियमाचा भाग असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ही सुनावणी न्यायमूर्ती ए.एम.खानविलकर आणि न्यायमूर्ती बी. आर.खानविलकर यांच्या खंडपीठासमोर झाली. त्यामुळे आता सीबीआयला कोणत्याही राज्यात चौकशी करण्यापूर्वी संबंधित राज्याची परवानगी घेणे अनिवार्य झाले आहे. (Aslam Shaikh said under the BJP Govt, CBI has become like a pan shop)
काय आहे नियम?
सीबीआई दिल्ली विशेष पोलीस स्थापना अधिनियम,1946 अंतर्गत सीबीआयला कोणत्याही तपासापूर्वी राज्याची परवानगी घेणे अनिवार्य असते. पोलीस यंत्रणा हा राज्याच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे तपासाचा प्रथम अधिकार राज्य पोलिसांना असतो. तरीही केंद्रीय यंत्रणांना तपास करायचा झालाच तर त्यासाठी राज्यांची परवानगी आवश्यक असते. सीबीआयचे कार्यक्षेत्र हे केंद्रीय विभाग आणि कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित असते. त्यामुळे राज्यात तपास करताना सीबीआयला परवानगी घेणे आवश्यक असते.
महाराष्ट्रासह ‘या’ आठ राज्यांमध्ये परवानगी अनिवार्य
आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, राजस्थान, केरळ, पंजाब आणि मिझोरम या राज्यांनी सीबीआयला परवानगीशिवाय तपास करण्यास ‘नो एन्ट्री’ केली आहे. सीबीआयला या राज्यांमध्ये तपास करायचा असल्यास तेथील राज्य सरकारची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.
महाराष्ट्र सरकारनं काही दिवसांपूर्वीच सीबीआयला राज्यात थेट तपास करण्याची दिलेली विशेष परवानगी काढून घेतली होती.
संबंधित बातम्या :
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, परवानगीशिवाय CBI ला महाराष्ट्रात एन्ट्री नाही
CBI च्या क्षमतेवर शंका नाही, पण राजकीय हस्तक्षेपामुळे महाराष्ट्रात नो एण्ट्री : गृहमंत्री
(Aslam Shaikh said under the BJP Govt, CBI has become like a pan shop)