निकालापूर्वीच फटाके, राजस्थान, मध्य प्रदेश अन् तेलंगणात हालचाली वाढल्या

| Updated on: Dec 03, 2023 | 8:28 AM

assembly election 2023 | पाच पैकी चार राज्यांचे विधानसभा निवडणुकीचे निकाल आज येत आहे. या निकालापूर्वी काँग्रेसकडून जल्लोष करण्यात आला. नवी दिल्लीत काँग्रेस कार्यालयाबाहेर फटाके फोडण्यात आले आहे.

निकालापूर्वीच फटाके, राजस्थान, मध्य प्रदेश अन् तेलंगणात हालचाली वाढल्या
assembly-election
Follow us on

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणाचा विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली. या निवडणुकीचे चित्र अजून काही स्पष्ट झाले नाही. परंतु निवडणूक निकालापूर्वी काँग्रेसकडून जल्लोष सुरु झाला आहे. नवी दिल्लीत काँग्रेस कार्यालयाबाहेर फटाके फोडण्यात आले. दरम्यान मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यात काँग्रेसकडून हालचाली वाढवल्या आहेत. काँग्रेसने आपल्या आमदारांना एकत्र बोलवले आहे. आपले आमदार फुटू नये, याची काळजी काँग्रेसकडून घेतली जात आहे. तसेच अपक्ष आणि इतर लहान पक्षांवर लक्ष ठेवले आहे. राजस्थानमधील काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना दिल्लीत पोहचण्याचे आदेश दिले आहेत.

तेलंगणात काँग्रेस अलर्ट

तेलंगणात काँग्रेसला सत्ता मिळण्याची शक्यता विविध एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आली होती. यामुळे निकालाचे चित्र स्पष्ट होण्यापूर्वी तेलंगणात हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेस सकाळी अलर्ट मोडवर आली आहे. डीके शिवकुमार यांच्यासह कर्नाटकातील सर्व 11 मंत्री हैदराबादमध्ये दाखल झाले आहे. काँग्रेसने प्रत्येक उमेदवारासोबत एक विश्वासू कार्यकर्ता ठेवला आहे. यामुळे उमेदवारांची खरेदी- विक्री होणार नाही.

हे सुद्धा वाचा

राजस्थानमध्ये घेराबंदी

राजस्थानमध्ये काही एक्झिटपोलकडून ‘काटें की टक्कर’ असल्याचे दाखवले जात आहे. यामुळे काँग्रेसकडून ऑपरेशन लोटस होऊ नये म्हणून पक्षाकडून खबरदारी घेतली जात आहे. काँग्रेस आणि भाजप वेगवेगळ्या स्तरावर तयारी करत आहे. त्रिशंकू विधानसभा झाल्यास लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी पक्षीय पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. दोन्ही पक्षांनी आपले प्लॅन बी तयार केले आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्षांनी उमेदवारांना विजयाचे प्रमाणपत्र घेताच जयपूरला येण्याचे आदेश दिले आहे.

नवी दिल्लीत काँग्रेस कार्यालयाबाहेर जय श्रीरामचे पोस्टर लावण्यात आले आहे. निकालापूर्वी काँग्रेस कार्यालयाबाहेर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत. कार्यकर्ते हनुमानचे रुप घेऊन काँग्रेस कार्यालयात आले आहे.