Marathi News Politics Astrologer predicts assembly seats for mns in upcoming assembly elections update
येत्या विधानसभेत मनसेला दोन अंकी जागा मिळतील, ज्योतिषाचं भाकीत
नाशिक : लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार न उतरवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत मात्र दोन अंकी जागा मिळतील, असं भाकीत महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवलं आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. केंद्रात आणि राज्यात आता कोणाची सत्ता येणार, कोणाचे भविष्य काय सांगत आहे, मोदींची आणि राहुल गांधी यांची कुंडली कशी आहे, […]
Follow us on
नाशिक : लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार न उतरवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत मात्र दोन अंकी जागा मिळतील, असं भाकीत महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवलं आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
केंद्रात आणि राज्यात आता कोणाची सत्ता येणार, कोणाचे भविष्य काय सांगत आहे, मोदींची आणि राहुल गांधी यांची कुंडली कशी आहे, भाजप आणि शिवसेना यांना महाराष्ट्रात कितपत यश मिळेल, शरद पवार, राज ठाकरे, पार्थ पवार, सुजय विखे यांची कुंडली कशी आहे, तसेच नाशिकमध्ये कोणाच्या हाती सत्ता येणार, याबाबत महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर यांच्याशी बातचीत केली आहे.
ज्योतिष सिद्धेश्वर मारटकर यांनी काय भाकितं वर्तवली आहेत?
मोदी पुन्हा पंतप्रधान होणार, भाजप पूर्ण बहुमताने येणार नाही, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी होणार, छोटे पक्ष आणि घटक पक्षांना सोबत घेऊन मोदी पुन्हा सत्ता स्थापन करणार
राहुल गांधींना पंतप्रधान होण्यासाठी सध्याची परिस्थिती चांगली नाही, पण पुढे त्यांचं भविष्य चांगलं वाटतंय.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना भविष्यात मोठी संधी मिळू शकते
महाराष्ट्रात भाजप शिवसेनेच्या जागा कमी होणार
शरद पवार यांची पत्रिका चांगली, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जागेत वाढ होणार
राज ठाकरे यांचा रवी-मंगळ हा राहुल गांधीसारखाच, विधानसभेला त्यांचा प्रभाव वाढणार, भाजप शिवसेनेला फटका बसणार
पार्थ पवार यांची पत्रिका चांगली, श्रीरंग बारणेंना ते चांगली टक्कर देणार, खूप कमी फरकाने त्यांना जय-पराजयाच सामना करावा लागेल
नाशिकमध्ये समीर भुजबळ यांची ताकद वाढली आहे, खूप कमी फरकाने या दोघांपैकी कोणीतरी येऊ शकत
सुजय विखे यांचा एकतर्फी विजय निश्चित, यात काही वाद नाही