मुंबई: कोरोना गेलेला नाही, सावध राहा. आपण धोक्याच्या वळणावर आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर भाजपने टीका केली आहे. ज्या राज्याचा मुख्यमंत्री घरीच बसून असतो, ते राज्य नेहमीच धोक्याच्या वळणावर असते, अशी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. (atul bhatkhalkar criticized uddhav thackeray over his speech)
अतुल भातखळकर यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. ज्या राज्याचा मुख्यमंत्री कायम घरी बसलेला असतो ते राज्य सतत धोक्याच्या वळणावर असते, अशी टीका भातखळकर यांनी ट्विटमधून केली आहे.
मुख्यमंत्री राज्यातील जनतेला काळजी घ्यायला सांगत आहेत. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. कारण ते घरी बसले आहेत. कोणताही निर्णय घेत नाहीत. अर्थपूर्ण बदल्या, बढत्या सोडून प्रशासन ठप्प झाले आहे. त्यामुळे जनतेला काळजी घेणं भाग आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु त्यांच्या संवादात कोणताही दृष्टीकोन नव्हता. ठोस निर्णय नव्हते. वीजबिल माफी आणि शेतकरी अनुदानप्रश्नी काहीही दिलासा दिला नाही. केवळ तोंडाच्या वाफा दडवल्या, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
महाराष्ट्राने कोरोनाची रुग्णसंख्या रोखली असली तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर असून मला कोणताही लॉकडाऊन करायचा नाही पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे, असं मुख्यमंत्र्यांनी काल म्हटलं होतं. त्यावरून भातखळकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
‘माझे कुटुंब माझी, जबाबदारी मोहीम’ राबविताना यंत्रणेतील सर्व लोकांनी अफाट काम केले आहे. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जन जागृती करणे हे साधेसुधे काम नाही. या मोहिमेचा हेतू केवळ चौकशी करणे नाही तर आरोग्य नकाशा तयार करणे आहे. यामध्ये आपल्याला किती जणांना सहव्याधी आहे ते कळले. या सर्वांशी यंत्रणेतील लोकांनी एक जिव्हाळा दाखवून संपर्क साधणे व चौकशी करणे महत्वाचे आहे, असंही ते म्हणाले होते.
ज्या राज्याचा मुख्यमंत्री कायम घरी बसलेला असतो ते राज्य सतत धोक्याच्या वळणावर असते…#वाफा@8pm
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 22, 2020
संबंधित बातम्या:
(atul bhatkhalkar criticized uddhav thackeray over his speech)