मुंबई : आर्यन खान प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्ला करायला सुरुवात केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मलिक यांनी ड्रग्स प्रकरणात आणि अंडरवर्ल्डशी संबंधित काही गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर मलिक यांनी सुरु केलेल्या आरोपांच्या मालिकेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळाने नवाब मलिक यांची स्तुती केल्याची माहिती मिळतेय. याच मुद्द्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. (Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray and Nawab Malik)
‘गुड गोइंग! नवाब मलिक यांच्या लढ्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे. कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदेत बेछूट आरोप करणारे नवाब मलिक केवळ व्यवसायाने नाहीत तर मनोवृत्तीने देखील भांगारवाले आहेत. अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतायत’, अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
गुड गोइंग! नवाब मलिक यांच्या लढ्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे.
कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदेत बेछूट आरोप करणारे नवाब मलिक केवळ व्यवसायाने नाहीत तर मनोवृत्तीने देखील भांगारवाले आहेत. अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतायत. pic.twitter.com/uY6fPwRR64— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 11, 2021
गेल्या काही दिवसांपासून मलिकांनी भाजपविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. आता तर मलिकांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आरोपांची मालिका सुरु केलीय. फडणवीस यांच्या आशीर्वादानेच राज्यात ड्रग्सचा बाजार सुरु झाल्याचा आरोप मलिकांनी केला होता. त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर आज पुन्हा एकदा मलिक यांनी फडणवीसांवर मुन्ना यादव, रियाझ भाटी यांच्यावरुन फडणविसांवर गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिकांचं ‘गुड गोईंग’ अशा शब्दात कौतुक केल्याची माहिती मिळत आहे.
दुसरीकडे मलिक यांनी आता थांबलं पाहिजे असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते आज दिल्लीत बोलत होते. कधी कुणाबरोबर फोटो असेल तर तो पुरावा होऊ शकत नाही. 20 वर्षापूर्वीची व्यक्ती आज वेगळी असते. गुंड पुंड भाजपच्या वॉशिंगमशीनमध्ये स्वच्छ होतो. निवडणुकीच्या राजकारणासाठी राजकारण कोणत्या थराला गेलेय? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणी तरी कर्त्या नेत्याने हस्तक्षेप केला पाहिजे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. खूप प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत. नवाब मलिक यांचे हल्ले जोरदार आहेत. एका चिडीतून ते करत आहेत. मी राज्यपालांना भेटलो. त्यांच्याशी यावरही चर्चा केली पाहिजे. समेट घडवला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
इतर बातम्या :
अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिली, प्रविण दरेकरांचा घणाघात
Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray and Nawab Malik