मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच एनसीबी आणि भाजप नेत्यांवर आरोपांची मालिका सुरु ठेवलीय. मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना मुदतवाढ मिळवून देण्यासाठी भाजपचा एक मोठा नेते प्रयत्नशील असल्याचा आरोप केला आहे. मलिकांच्या या आरोपाला आता भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. केंद्रात लॉबिंग करुन पोस्टिंग करायला किंवा मिळवायला ही काय महाभकास आघाडी आहे काय? असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.
केंद्रात मोदीजींचं सरकार आहे. केंद्रात लॉबिंग करुन पोस्टिंग करायला किंवा मिळवायला ही काय महाभकास आघाडी आहे काय? याऊलट आर्यन खान प्रकरणात एसआयटी तपासाचं काय झालं? या एसआयटीने आपली चौकशी का थांबवली? याची माहिती आधी द्या. फर्जीवाडा, फर्जीवाडा नाही तर हा भ्रष्टाचारवाडा आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी मलिकांच्या आरोपांना उत्तर देताना केलीय.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध एनसीबीच्या वरीष्ठ अधिकार्यांनी फर्जीवाडा करणारा व चुकीच्या पद्धतीने लोकांना अडकवणारा अधिकारी असल्याचा अहवाल दिला आहे. असं असतानाही भाजपाचा राज्यातील एक मोठा नेता त्याला पुन्हा मुदतवाढ मिळवून देण्यासाठी केंद्रीय गृहविभागाकडे प्रयत्नशील आहे, असा गौप्यस्फोट मलिक यांनी केलाय. तसंच समीर वानखेडे यांना मुदतवाढ द्या. त्यामुळे खंडणी वसूल करण्याच्या खेळात कोण कोण सहभागी आहेत हे उघड करण्याची संधी मिळेल, असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.
मॅडी नावाच्या पंच साक्षीदाराला जुन्या केसमध्ये मागील तारखेवर जबाब नोंदविण्यासाठी एनसीबीच्या किरणबाबू नावाच्या अधिकाऱ्याकडून कार्यालय सोडून अन्यत्र बोलावण्यात आल्याची संभाषणाची ऑडिओ क्लिप मलिक यांनी जाहीर केलीय. याद्वारे मलिकांनी एनसीबीच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा एक गंभीर आरोप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलाय.
(2/2) pic.twitter.com/G0aLdtyWpR
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 2, 2022
Audio clip of conversation between Sameer Wankhede and Maddy.@dg_ncb @satyaprad1 pic.twitter.com/dLrTZTv2Fr
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 2, 2022
नवाब मलिकांचं कुठलही वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. कारण बिनबुडाचे आरोप ते सातत्याने करत असतात. हायकोर्टानंही त्याबाबत नवाब मलिकांना बजावलं आहे. कुठलीही कॅसेट समोर आणायची आणि काहीतरी खळबळजनक केलंय असं दाखवायचं आणि चर्चेत राहायचं. यापलीकडे मलिकांच्या वक्तव्याला काडीची किंमत नाही. कुठलही क्लिप, कोण बोललं? हे त्या त्या व्यवस्थेकडे द्या. जबाबात काही फेरफार होत असेल तर यंत्रणा आहेत. त्यांना कळवा, अधिकची माहिती द्या. त्या यंत्रणा कारवाई करतील. पण तुम्ही न्यायाधीश असल्यासारखं यायचं, फक्त माध्यमांसमोरच बोलायचं हे योग्य नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी मलिकांवर केली आहे.
इतर बातम्या :