Baba Siddique Case Latest Updates: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. याप्रकरणी कसून चौकशी करण्यासाठी पोलिसांनी एक दोन नाही तर, 6 राज्यांमध्ये सापळा रचला आहे. पोलिसांची 15 पथकं पुढील तपासासाठी तैनात करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. तर बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी 10 मोठे अपडेट्स जाणून घेऊ…
1. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहे. आतापर्यंत 6 आरोपींची ओळख समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह, प्रवीण लोनकर, जीशान अख्तर, शुबु लोणकर आणि शिवा प्रसाद गौतम अशा सहा आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
2. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून, 3 जण फरार आहे. ज्यामध्ये हमलावार धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह यांना पोलिसांना तात्काळ अटक केली. तर हत्येची जबाबदारी घेत असल्यांची पोस्ट करणाऱ्या शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याला देखील पोलिसांना पुण्यातून अटक केली आहे. तिसरा शूटर शिव प्रसाद गौतम फरार आहे. जीशान अख्तर आणि शुभम लोणकर देखील फरार आहेत.
3. मुंबई गुन्हे शाखेने रविवारी अटक केलेल्या दोन्ही गोळीबारांना जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात हजर केलं. यादरम्यान धर्मराज कश्यपने तो अल्पवयीन असल्याचा दावा केला, त्यानंतर कोर्टाने हाडांची ओसीफिकेशन चाचणी करण्याचे आदेश दिले. हाडांच्या ओसीफिकेशन चाचणीने धर्मराज अल्पवयीन नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता पोलीस आरोपीला मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करून कोठडी किंवा रिमांडची मागणी करतील.
4. जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाने शूटर गुरमेल सिंगला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलाने न्यायालयाला सांगितलं की, बाबा सिद्दीकी यांची हत्या नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे. त्यामुळे मारेकऱ्यांचा हेतू शोधणं अत्यंत गरजेचं आहे. मुंबई पोलिसांनी दोन्ही आरोपींना 14 दिवसांची कोठडी मागितली होती.
5. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणारा एक आरोपी हरियाणा येथील आहे. बाकी दोन शूटर धर्मराज आणि शिवकुमार उत्तर प्रदेश येथील आहेत. दोघांना देखील अटक करण्यात आली असून शिवकुमार फरार आहे.
6. पंजाब येथे राहाणारा झिशान तिन्ही आरोपींना सर्व माहिती बाहेरून देत होता. बाबा सिद्दीकी यांच्यावर ज्याठिकाणी गोळीबार करण्यात आली, त्या जागेची माहिती झिशान याने दिली होती. याशिवाय झीशानने त्यांच्यासाठी खोल्या भाड्याने देण्यासह इतर लॉजिस्टिक सपोर्टमध्येही मदत केली. जालंधर पोलिसांनी 2002 मध्ये झीशानला संघटित गुन्हेगारी, खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केली होती.
7. झिशान याच्या कुटुंबाबद्दल सांगियचं झालं तर, त्याने 10 वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. झिशान याचे वडील मुहम्मद जमील हे टाइल्सचे कंत्राटदार म्हणून काम करतात. आरोपीचा भाऊ त्याच्या वडिलांसोबत काम करतो. त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला आहे.
8. बाबा सिद्दिकीच्या फरार मारेकऱ्याच्या शोधात मुंबई पोलिसांचे पथक मध्य प्रदेशातील खंडवा येथील ओंकारेश्वर येथे पोहोचले. खंडव्याचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकारेश्वर तीर्थक्षेत्र येथीस संभाव्य ठिकाणांचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी अद्याप कोणाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली नाही.
9. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अनेक मोठे खुलासे समोर येत आहे. अनेक महिन्यांच्या योजनेनंतर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुटर्सने कुर्ला येथे 25 दिवसांपूर्वी घर भाड्याने घेतलं होतं. आरोपी सतत रेकी करत असल्याची माहिती देखील समोर आली. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी तिघांनीही काही वेळ तेथे थांबल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
10. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबादारी गुंड लॉरेन्स बिश्नोई याने स्वीकराली असून सलमान खान आणि दाऊद इब्राहिमच्या बाजून जो असेल त्याची हत्या करु धमकी दिली. अशात सलमान खान याच्या घराबाहेरील सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.