Baba Siddique Death : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. देवीची विसर्जन मिरवणूक जात असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्यांच्या मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र खळबळ माजली. तीन जणांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. घटनेनंतर पालिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून एक जण फरार आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांचा फोटो देखील समोर आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 आरोपी हरियाणा येथील असून दुसरा आरोपी उत्तर प्रदेश याठिकाणी राहणारा आहे. करनैव सिंह आणि धर्मराज कश्यप अशी आरोपींची नावं आहेत. करनैल हरियाणा आणि धर्मराज यूपीचा रहिवाशी असल्याची माहिती दिला आहे. तिघांमधील एक आरोपी अद्यापही फरार आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी अन्य राज्यातील शूटरला सुपारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हत्येचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तसेच आरोपींबाबत फारशी माहिती देखील समोर आलेली नाही.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘घडलेली घटना दुर्भाग्यपूर्ण आहे. माझं डॉक्टर आणि पोलिसांसोबत बोलणे झाली आहे. याप्रकरणी दोन जणांनी अटक करण्यात आली आहे. त्यामधील एक यूपी आणि एक हरियाणा येथील आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. कायदा आणि सुव्यवस्था आपल्या हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आम्ही मुंबई पोलिसांना दिल्या आहेत. मुंबई पोलीस लवकरच तिसऱ्या आरोपीला अटक करतील अशी खात्री आहे. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल.’ असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात केलेल्या आरोपींचा बिश्नोई गँगशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या प्राथमिक चौकशीतून माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. पण तिसरा आणि फरार आरोपीच मुख्य सूत्रधार असल्याची कबुली अन्य आरोपींनी दिली आहे. तिन्ही आरोपींचं वय 28 पर्यंत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.