Baba Siddique Death: उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय देवीची विसर्जन मिरवणूक सुरु असताना रस्त्यावरील लाईट देखील बंद होत्या. तर गुन्हेगारांनी तोंडाला रुमाल बांधले होते. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या संपूर्ण नियोजन करुन कण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पण तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.
आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर सहा राऊंड गोळीबार केला. गोळीबारात त्यांच्या छातीत तीन गोळ्या लागल्या. गोळी लागल्यानंतर बाबा सिद्दीकी यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आता याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहे.
बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या हत्येप्रकरणी आणखी एक मोठी माहिती समोर येक आहे. बाबा सिद्दीकी यांना पोलिसांनी Y स्तराची सुरक्षा दिली होती. बाबा सिद्दीकी यांच्यासोबत एक पोलीस हवालदार तैनात करण्यात आला होता. मात्र, गोळीबाराच्या वेळी हा पोलीस कर्मचारी कुठे होता आणि प्रत्यक्षात काय घडले? याची माहिती अद्याप समोर आलेलं नाही.
करनैव सिंह आणि धर्मराज कश्यप अशी आरोपींची नावं आहेत. करनैल हरियाणा आणि धर्मराज यूपीचा रहिवाशी असल्याची माहिती दिला आहे. मुंबई क्राईम ब्रांच यूनिट 3 मध्ये दोन आरोपींना ठेवण्यात आलं असून, तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.
दोन्ही आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गेल्या काही दिवसांपासून बाबा सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवली होती. फुलप्रूफ प्लान करून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याचं सिद्ध झालं आहे.
बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात केलेल्या आरोपींचा बिश्नोई गँगशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या प्राथमिक चौकशीतून माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. पण तिसरा आणि फरार आरोपीच मुख्य सूत्रधार असल्याची कबुली अन्य आरोपींनी दिली आहे. तिन्ही आरोपींचं वय 28 पर्यंत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.