मुंबई: शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला जाण्यापासून रोखण्यात आल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांना मुंबईत रिलायन्सच्या कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखण्यात आलं. बच्चू कडू यांना नागपुरातचं रोखण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे बच्चू कडू यांना गेस्ट हाऊसमध्ये ताटकळत थांबावे लागले. चार तासाच्या नाट्यानंतर अखेर त्यांना मुंबईला येण्याची परवानगी देण्यात आली. राज्य सरकारनेच बच्चू कडू यांना रोखल्याने त्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात असून रिलायन्स विरोधातील आंदोलनाला हवा मिळावी म्हणूनच बच्चू कडू यांना नागपुरात रोखून धरल्याचा ड्रामा करण्यात आला का? अशी चर्चाही रंगली आहे. (Bacchu Kadu was stopped by the Nagpur police, full political drama in Nagpur )
नेमकं काय घडलं?
मुंबईत आज रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरही उपस्थित राहणार आहेत. बच्चू कडूही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नागपूरहून मुंबईकडे निघाले होते. पण त्यांना नागपूरमध्येच रोखून ठेवण्याचे आदेश पोलिसांना आले. त्यामुळे पोलिसांनी बच्चू कडू यांचा माग काढत त्यांना नागपूरला जाण्यास मज्जाव केला. तसे आदेशच असल्याचं पोलिसांनी बच्चू कडू यांना सांगितलं. त्यामुळे त्यांना गेस्ट हाऊसमध्ये तिष्ठत बसावं लागलं.
फोनाफोनी सुरू
पोलिसांनी रोखल्यानंतर बच्चू कडू संतापले. यावेळी त्यांनी फोनाफोनी सुरू केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपासून ते प्रशासनातील अधिकाऱ्यांपर्यंत त्यांनी सर्वांनाच फोन करून त्यांना कोणी रोखून ठेवण्याचे आदेश दिले याची माहिती घेण्यास सुरुवात केली. पण त्यांना ठोस अशी माहिती मिळाली नाही. यावेळी त्यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनाच फोन लावून याबाबतची माहितीही घेण्याचा प्रयत्न केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्याची चूक
पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना मिळालेल्या चुकीमुळे हा सर्व खोळंबा झाल्याचं नंतर बच्चू कडू यांना सांगण्यात आलं. माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी तशी माहिती दिली. पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मुंबईकडे येणारी सकाळी 9.30ची फ्लाईट चुकल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रशासनाचा गैरसमज झाल्याने मला रोखण्यात आलं. पोलीस अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या ही चूक लक्षात आली, असं त्यांनी सांगितलं.
चार तासांचा ड्रामा
पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना बच्चू कडू यांना रोखण्याची चुकीची माहिती मिळाल्याने हा सर्व प्रकार घडला. हा प्रकार लक्षात येण्यासाठी चार तास लागले. त्यानंतर बच्चू कडू यांना मुंबईला जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंर ते दुपारी 12.30 वाजताच्या फ्लाईटने मुंबईकडे रवाना झाले. यावेळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण
यावेळी बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. मोदी सरकार केवळ देशातील दोन उद्योजकांसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींचं कायद्यात रुपांतर करावं, अशी मागणी त्यांनी केली. तसेच केंद्राचे नवे कृषी कायदे व्यापाऱ्यांच्या हिताचे असून अंबानींच्या इशाऱ्यावरच हे सरकार काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. रावसाहेब दानवे यांचे म्हणणे दुर्दैवी आहे. त्यांचा डीएनए एकदा चेक करावा लागेल. त्यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे; की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल,” अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. तर, राजू शेट्टी यांनीही बच्चू कडू यांना रोखण्यात आल्याबद्दल सरकारवर टीका केली आहे.
मुंबईत मोर्चा कुठे? कशासाठी?
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. अंबानी कार्पेट हाऊसवर हा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा ठाण्यातील आनंद नगर टोलनाका मार्गे मुंबईत दाखल झाला. या टोल नाक्यावर यावेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Bacchu Kadu was stopped by the Nagpur police, full political drama in Nagpur )
काँग्रेसकडून समर्थन
महाविकास आघाडीचं सरकार हे जनतेचं सरकार आहे. मंत्री असो की विरोधक कुणाच्याही बाबतीत आमचं सरकार भेदभाव करत नाही, हेच बच्चू कडू यांना रोखल्यामुळे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केली. आम्ही पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करत नाही. भाजपसारखा आमचा हस्तक्षेप नसतो, असंही लोंढे म्हणाले. (Bacchu Kadu was stopped by the Nagpur police, full political drama in Nagpur )
Bacchu Kadu | कृषी कायद्याविरोधात बोलण्यास मोदी आणि शाह तयार नाहीत : बच्चू कडूhttps://t.co/owJftHZbu3@RealBacchuKadu
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2020
संबंधित बातम्या:
कृषी कायद्याविरोधात बोलण्यास मोदी आणि शाह तयार नाहीत : बच्चू कडू
वरिष्ठांच्या आदेशावरुनच बच्चू कडूंना नागपुरात रोखलं?
(Bacchu Kadu was stopped by the Nagpur police, full political drama in Nagpur )