अकोला : पातूर आणि अकोला शहरातील विविध शासकीय कार्यालयांची मंत्री युसुफखाँ पठाण यांनी चांगलीच झाडाझडती घेतली! आता तुम्ही म्हणाल की हे युसुफखाँ पठाण कोण? तर हे दुसरे तिसरे कुणी नसून जलसंपदा आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री, तसंच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू आहेत. बच्चू कडू आपल्या अनोख्या आणि धडाकेबाज कार्यशैलीमुळे प्रसिद्ध आहे. बच्चू कडू हे आज थेट वेशांतर करुन युसुफखाँ पठाण बनले आणि त्यांनी अकोला, पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी देत तिथल्या कारभाराचा धांडोळा घेतला. (Bachchu Kadu disguise and inspects government offices in Akola and Patur)
बच्चू कडू यांनी वेशांतर करुन सरकारी कार्यालये, स्वस्त धान्य दुकानांना भेट दिली. तिथे धान्य वितरणात काही काळाबाजार तर होत नाही ना? याची माहिती त्यांनी घेतली. त्याचबरोबर त्यांनी महानगरपालिकेतही धडक दिली. विविध विभागात जाऊन त्यांनी तिथल्या कामकाजाची पाहणी केली. महापालिका आयुक्त निमा अरोरा त्यांच्या कक्षात उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या स्विय सहायकांशी त्यांनी संवाद साधला. महत्वाची बाब म्हणजे महापालिकेली एकही कर्मचारी बच्चू कडू यांना ओळखू शकला नाही. बच्चू कडू तिथून निघून गेल्यानंतर मात्र महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
राज्यमंत्री बच्चू कडू बनले युसुफखाँ पठाण! वेशांतर करुन बच्चू कडू यांनी अकोला, पातूरमधील सरकारी कार्यालये, रेशन दुकारांची झाडाझडती घेतली. @RealBacchuKadu @OfficeofUT @AjitPawarSpeaks @AkolaPolice #bachhukadu #DisguiseAndInspection #Akola #Patur pic.twitter.com/2k6nUjQPVy
— sagar joshi (@spjoshi11) June 21, 2021
अकोला शहरातील शासकीय कार्यालयांना भेट दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आपल्या मोर्चा पातूर शहराकडे वळवला. तिथल्या शासकीय कार्यालयामध्ये भेटी दिल्यानंतर आजूबाजूच्या दुकानांमध्ये जाऊन गुटख्याची विक्री होते का? याचीही पाहणी त्यांनी केलीय. बच्चू कडू यांनी वेशांतर करुन टाकलेल्या एकप्रकारच्या धाडीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. सध्या अकोला जिल्ह्यात बच्चू कडू यांच्या वेशांतराचीच चर्चा सुरु आहे.
अकोल्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी असणाऱ्या बच्चू कडू यांनी मार्च महिन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील जेवणाची व्यवस्थाही पाहिली. मात्र, सर्वच रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याचा प्रकार समोर आला. यामुळे संतापलेल्या बच्चू कडू यांनी सर्वांसमोर तेथे उपस्थित आचाऱ्याच्या कानशिलात लगावली होती.
संबंधित बातम्या :
लाल दिव्याची गाडी, पण हक्काचं घर नाही; बच्चू कडूंचं खरं नाव माहीत आहे का?
अधिकाऱ्यांनी फाईली दाबल्या तर कायदा मोडून तुरुंगातही जाईन, रक्तदान करुन बच्चू कडूंनी पदभार स्वीकारला
Bachchu Kadu disguise and inspects government offices in Akola and Patur