राज ठाकरेंचं नवं ट्वीट
Image Credit source: TV9 Marathi
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray News) कमालीचे सक्रिय झालेत. भोंग्याच्या (Loudspeaker Controversy) मुद्दयापासून आक्रमक पवित्रा घेतल्यानं राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटम पाळण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले. चार मे उजाडताच राज ठाकरेंचे कार्यकर्ते मशिदींवरील भोंग्याचा उत्तर देण्यासाठी सज्ज होतेच. राज ठाकरेंनी या दरम्यान राज ठाकरेंनी एक व्हिडीओ ट्वीट केला. हा व्हिडीओ होता बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Speech) यांचा. या व्हिडीओच्या माध्यमातून आता राज ठाकरेंनी आपले पुढचे इरादेही स्पष्ट केले आहेत. खरंतर मंगळवारी जारी केलेल्या पत्रातूनच राज ठाकरेंनी शिवसेना आणि थेट उद्धव ठाकरे यांनाही चॅलेंज करण्यात आलं. शिवसेनेच्या भूमिकेवरुनही सवाल उपस्थित करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ शेअर करत शिवसेनेला तर डिवचलं आहेच. आपणच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न राज ठाकरेंकडून यानिमित्तानं केला जात असल्याचं जाणकाराचं म्हणणंय. दरम्यान, ट्वीट करताना राज ठाकरेंनी काहीच कॅप्शन लिहिलं नव्हतं. अवघ्या 36 सेकंदाच्या या व्हिडीओच्या माध्यमातून राज ठाकरेंनी अधोरेखित केलेले 3 महत्त्वाचे मुद्दे कोणते, हे जाणून घेऊयात…
राज ठाकरेंनी ट्वीट केलेला तो व्हिडीओ पाहा :
बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा 36 सेकंदाचा व्हिडीओ राज ठाकरेंनी शेअर केला. या व्हिडीओ बाळासाहेब ठाकरे यांनी आता मनसेचं हाती घेतलेल्या मशिदींच्या मुद्द्यावर भाष्य त्याकाळीच करुन ठेवलेलं होतं.
राज ठाकरेंनी ट्वीटद्वारे स्पष्ट केलेले 3 इरादे
- खरे वारसदार कोण? – या व्हिडीओच्या माध्यमातून राज ठाकरेंनी शिवसेनेला खऱ्या अर्थानं डिवचलंय, अशी चर्चा रंगली आहे. मनसेनं बाळासाहेब ठाकरेंनी नमूद केलेले मुद्दे हाती घेतलेत. त्यावर मनसे आक्रमक झाली आहे. शिवसेनेनं बाळासाहेबांच्या विचारांचा आणि त्यांच्या भूमिकेला बगल दिल्याचा अप्रत्यक्ष टोलाच राज ठाकरेंच्या ट्वीटच्या निमित्तानं लगावला गेल्याची कुजबूज सुरु झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर मनसेनं शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं ट्वीट अत्यंत बोलकं आहे.
- भोग्यांना पुढे काय? – मशिदींवरील भोंग्याचा विषय झाल्यानंतर आता राज ठाकरे पुढे कोणती रणनिती अवलंबणार, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. अशाच ट्वीट करत राज ठाकरेंनी आपले पुढचे इरादेही स्पष्ट केले असल्याचा तर्क लढवला जातोय. मशिदींवरील भोंग्यानंतर आता रस्त्यावर केली जाणार नमाज हा मुद्दा मनसे घेईल, अशी शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या भाषणात नमूद केलेल्या मुद्द्याप्रमाणे राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांना त्या अनुशंगानं येत्या काळात काय भूमिका घ्यायला लावतात, हेही पाहणं महत्त्वाचं.
- मुख्यमंत्री ठाकरेंना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर? – शिवसेनेचं महाविकास आघाडीमधलं स्थान आणि मनसेची आक्रमकता यावरुन सध्या राजकारण तापलंय. राज ठाकरेंनी शिवसेनेला थेट आव्हान दिलंय. बाळासाहेब ठाकरेंच्या मुद्द्यांना टेक ओव्हर करण्याचा प्रयत्न मनसेकडून होतोय का? अशा प्रश्नही यानिमित्तानं उपस्थित होतोय. मात्र शिवसेनेची आक्रमकता सत्तेत असल्यापासून मवाळ झाल्याचाही आरोप अनेकदा केला जातो. त्यानंतर आता राज ठाकरेंकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या मुद्द्यांवर राज ठाकरे पुन्हा आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत.