योगेश बोरसे, बारामती, पुणे, दि. 18 फेब्रुवारी 2024 | लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू वाहू लागले आहे. निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावावर चर्चा सुरु केली आहे. काही ठिकाणी उमेदवार निश्चित झाले आहेत. लोकसभा निवडणुका मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु त्यापूर्वी सर्वात आधी पवार यांच्या बारामतीमध्ये प्रचाराचा धुरळा सुरु झाला. आता संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष बारामती मतदार संघाकडे लागले आहे. कारण बारामती लोकसभा मतदार संघामध्ये पवार कुटुंबियांमध्येच लढत जवळपास निश्चित झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याचे बोलले जात आहे. यामुळे बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांचा प्रचार रथ फिरत आहे. या प्रचार रथाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांच्या कार्याची माहिती दिली जात आहे. त्यासाठी गाडीवर सुनेत्रा पवार यांचे फ्लॅक्स लावण्यात आले आहे.
सुनेत्रा पवारानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचा विकास रथ तयार झाला आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकास कामाचा रथ आता बारामतीमध्ये फिरू लागला आहे. या रथाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये मांडलेले प्रश्न आणि केलेली कामे ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.
शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील विकास रथ आता फिरू लागला आहे. दोन दिवसांपासून सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकास कामाचा रथ फिरत आहे. आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा विकास रथ फिरू लागला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने आता नागरिकांमध्ये केलेल्या कामाची जनजागृती केली जात आहे. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू झाला आहे.
हे ही वाचा
बारामती लोकसभेसाठी अजित पवार यांचा उमेदवार ठरला ? प्रचाराचा रथ फिरणार