गोपीनाथ गड, बीड : मी रुकणार नाही, मी झुकणार नाही, मी थकणार नाही…असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या पक्षातील विरोधकांना इशारा दिला. मी मनात काहीच साठवून ठेवत नाही. यापूर्वी मी अनेक वेळा माझी भूमिका मांडली आहे. अन् ज्यांना इशारा द्यायचा आहे, त्यांना दिलाय…त्यांना तो मिळालाही आहे. माझे प्रत्येक वाक्य कोणाला तरी लागू पडते, मी परिवाराच्या भल्यासाठी नाही तर लोकांसाठी राजकारणात आले आहे, असे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून पक्षांमध्ये घुसमट होत असल्यामुळे पंकजा मुंडे शनिवारी चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या स्मृतिदिनानिमित्त बीडमधील परळीच्या गोपीनाथ गडावर त्या बोलत होत्या.
मी माझ्या नेत्याची भेट घेणार
पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून राजकारणात चर्चा सुरु आहे. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी आपल्या भाषणातून संकेतात दिली. पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी माझ्या शब्दावर ठाम आहे. यापूर्वी मी अनेक वेळा भूमिका मांडली आहे. कारण कधी मी माझ्या मनात काहीच साठवून ठेवत नाही. मला ज्यांना इशारा द्यायचा असतो, त्यांना मी दिला आहे अन् त्यांना तो मिळलाही आहे. परंतु माझे प्रत्येक वाक्य कोणाला कोणाला लागू पडत आहे.
त्यांना बंदुका ठेऊ देणार नाही
मी अनेकवेळा भूमिका मांडली, भगवान गडावर माझी भूमिका मांडली आहे. मी माझ्या परिवाराचे भले करण्यासाठी राजकारणात आले नाही तर मी लोकांसाठी राजकारणात आली आहे. मला भूमिका घ्यायची असेल तेव्हा मी माध्यमांना बोलून भूमिका मांडेल. कोणाच्या खाद्यांवर बंदुक ठेऊन मी काम करणार नाही. परंतु माझ्या खाद्यांवर अनेक जण बंदूक ठेवतात. त्या बंदुका मी ठेऊ देणार नाही.
माझ्या नेत्याची भेट घेणार
मी माझे नेते अमित शाह यांची भेट घेणार आहे. त्यांच्यांसोबत सर्व विषयांवर बोलणार आहे. त्यांना विचारणार आहे की, माझ्यासाठी तुमच्या मनात काय आहे…आता चार वर्षे झाली आहेत. जसा रामाने बाण सोडला तर तो परत येत नसतो. तसाच माझा गेलेला शब्द परत फिरवायची वेळ येऊ नये. रडगाणे गाणारे मी नाही…मी कोणापुढे पसरणार नाही…मी रुकणार नाही, थकणार नाही, कोणासमोर झुकणार नाही…हे सर्व माझ्या लोकांसाठी करणार आहे. मला कुणाकडून काही अपेक्षा नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.