“त्या विंड मिलच्या प्रकारात तो वॉचमन बौद्ध समाजाचा होता. संतोष देशमुख मराठा समाजाचे होते. जेव्हा वॉचमनला तिथे मारहाण करण्यात आली. खंडणीसाठी वाल्मिक कराडचे गुंड लोक तिथे गेले. वॉचमनने त्यांना अडवलं म्हणून त्याला मारहाण केली. तिथे संतोष देशमुख यांनी उघड भूमिका घेऊन त्यांना रोखल” असं आमदार संदीप क्षीरसागर बीड येथील विराट मोर्चात सांगितलं. “मी ओबीसी आहे. पहिला ओबीसी आहे, जो ठामपणे सांगतो, वाल्मिक कराडला आत टाका. गावच्या लोकांना जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले, अधिवेशनात आवाज उठवू सांगितलं” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.
“सीएम साहेबांच्या जवळचे अभिमन्यू पवार यांना मी, जेव्हा ही घटना सांगितली, तेव्हा त्यांनी संभागृहात साथ दिली. हा जाती-पातीचा विषय नाही. सुरुवातीला म्हटलेलं राजकारण आणणार नाही, या सर्वांनी साथ दिली. मुख्यमंत्री तसच उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे बोलले, दोषी कोणी असेल तरी त्याला सोडणार नाही” असं संदीप क्षीरसागर म्हणाले.
‘अठरापगड जातीचे लोक घरचा माणूस गेला म्हणून एकत्र आले’
“अभिमन्यू पवार यांना मी बोललो होतो, लोकांमध्ये रोष आहे, हा जातीपातीचा मोर्चा नाही. हिंदू, मुस्लिम, बौद्ध अठरापगड जातीचे लोक आपल्या घरचा माणूस गेला, त्याला न्याय देण्यासाठी म्हणून जमले आहेत. एसपीची बदली झाली. दोन नंबरचे धंदे बंद झाले. पण वाल्मिक कराडला अजून अटक झालेली नाही. खंडणीमुळे कनेक्शन 302 लागतं. 19 दिवस होऊनही त्याला अटक झालेली नाही” याकडे संदीप क्षीरसागर यांनी लक्ष वेधलं. “मी मंतदारसंघाचा दौरा केला. तेव्हा लोकांकडून मागणी आली, वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंच संरक्षण आहे. हा खटला चालेपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे” अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली.