Nana Patole : नाना पटोलेंच्या मनात कसली भिती? मतमोजणीआधी महत्त्वाच विधान

| Updated on: Nov 22, 2024 | 12:48 PM

Nana Patole : मतमोजणीला आता फक्त काही तास उरले आहेत. उद्या 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. हे राज्य महाविकास आघाडीच्या हातात जाणार की, महायुतीच्या ते चित्र उद्या स्पष्ट होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मतमोजणीआधी महत्त्वाच विधान केलं आहे.

Nana Patole : नाना पटोलेंच्या मनात कसली भिती? मतमोजणीआधी महत्त्वाच विधान
Follow us on

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असं संजय राऊत म्हणाले. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रतिक्रिया विचारली. ते म्हणाले की, ‘संजय राऊत हायकमांड त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही’ निवडणूक आयोगाने आता नव्याने आलेल्या मतदानाच्या आकडेवारीची माहिती दिलीय. त्यावर नाना पटोले म्हणाले की, “निवडणूक आयोगाची यंत्रणा चुकीची आहे. लोकसभेत असा प्रकार झाला. निवडणूक आयोगाकडे तक्रारी केली, तर ते बोलतात आम्ही बरोबर आहोत. आम्ही सर्व उमेदवारांना 17 सी फॉर्म बंधनकारक केला आहे. कारण कुठली तफावत आली, तर तिथेच सापडेल”

“वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आमचे आमदार सत्तेमध्ये बसतील, असं म्हटलय. त्यावर निकाल काही तासांवर आला आहे. या चर्चेवर प्रतिक्रिया देणं योग्य नाही” असं नाना पटोले म्हणाले. नाना बैठकांमधून गायब आहेत असा प्रश्न त्यांना विचारला, त्यावर नाना पटोले म्हणाले की, “देवीचा आशिर्वाद घ्यायला गेलेलो. देवी पावणार. भगवान श्रीराम, हनुमान, देवी आमच्यासोबत आहे”

नाना पटोलेंच्या मनात कसली भिती?

स्ट्राँग रुम बाहेर काही गडबड होईल असं वाटतं का? त्यावर नाना पटोलेंनी हो असं उत्तर दिलं. “पोलिसांना आम्ही स्ट्राँग रुममध्ये येणाऱ्या गाड्या, ट्रक तपासायला सांगितले आहेत. महायुतीत गडबड सुरु आहे. ते काहीही पाप करु शकतात. म्हणून स्ट्राँग रुमबाहेर संपूर्ण रात्र ते उद्या सकाळपर्यंत लक्ष ठेवणार आहोत. काही ठिकाणी अधिकारी सुद्धा गडबड करु शकतात ही आम्हाला भिती आहे” असं नाना पटोले म्हणाले.

कोण संपर्कात आहे?

“मतमोजणीच्या प्रक्रियेदरम्यान काही चूका कशा टाळायच्या ते आम्ही ऑनलाइन बैठक घेऊन सांगणार आहोत” असं नाना पटोले म्हणाले. “आम्ही बंडखोरांच्या संपर्कात आहोत. एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराविरोधातील बंडखोरांना भाजपने सपोर्ट केला. ते आमच्या संपर्कात आहेत” असं नाना पटोले यांनी दावा केला.