बीएचआर बँक घोटाळ्यात बड्या नेत्यांची नावे, यादी तयार, दोन दिवसांत गुन्हा दाखल होणार; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Dec 01, 2020 | 3:37 PM

भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटी रूपयांच्या घोटाळ्यांवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (big name in BHR scam; fir will file within two days says Eknath khadse)

बीएचआर बँक घोटाळ्यात बड्या नेत्यांची नावे, यादी तयार, दोन दिवसांत गुन्हा दाखल होणार; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
Follow us on

जळगाव: भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटी रूपयांच्या घोटाळ्यांवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या घोटाळ्यात राज्यातील काही बड्या नेत्यांची नावं आहेत. त्यांची यादीच तयार केली आहे. याप्रकरणात मोठी गँग अडकली आहे, असा गौप्यस्फोट करतानाच ईडीने कारवाई करावी असंच हे प्रकरण असून येत्या दोन दिवसात या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. (big name in BHR scam; fir will file within two days says Eknath khadse)

राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या वाढदिवसप्रसंगी एकनाथ खडसे यांनी आज मुक्ताई नगरमध्ये बीएचआर घोटाळ्याप्रकरणी मोठा दावा केला. यावेळी खडसे यांनी भाजपचं थेट नाव घेतलं नाही, मात्र त्यांचा संपूर्ण रोख भाजप नेत्यांकडे होता. त्यामुळे या घोटाळ्यातील भाजपमधील हा बडा नेता कोण? अशी चर्चा रंगली आहे.

बीएचआर घोटाळा प्रकरण खूप मोठं आहे. हे पहिलंच प्रकरण मी बाहेर काढलं आहे. ईडीने कारवाई करावी एवढं मोठं हे प्रकरण असून दोन दिवसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असं सांगतानाच या घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याचं किंवा कार्यकर्त्याचं नाव नाही. शिवाय भाजप सोडून माझ्या सोबत आलेल्यांचंही नाव नाही. यात काही मोठ्या नेत्यांची नावं आहेत. त्यांची यादीच तयार केली आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. कालपर्यंत लोक म्हणत होते एकनाथ खडसे संपले. आता मी एकच प्रकरण बाहेर काढल्याने महाराष्ट्र हादरलाय. हे पहिलंच प्रकरण आहे. अजून कितीतरी प्रकरणं आहेत. पहिल्या प्रकरणात मोठी गँग अडकली आहे, असा दावाही त्यांनी केला. (big name in BHR scam; fir will file within two days says Eknath khadse)

खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे

मी संकट मोचक नाही. मी अडचणीतून मार्ग काढणारा आहे, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नेतृत्व मी स्वीकारलं आहे. आता खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे, असं ते म्हणाले. तसेच पवारांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी दणक्यात साजरा करावा, असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी त्यांनी विधानपरिषदेच्या नियुक्तीवरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. पवारांनी नाथाभाऊंना आमदार करायचे ठरवले आहे. त्यामुळे तुमच्या मतदानाची गरज नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

काय आहे बीएचआर प्रकरण?

बीएचआर सहकारी बँकेतील घोळ उघडकीस आल्यानंतर २०१७ साली खडसे यांनी त्याविरोधात तक्रार केली होती. तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यांनी या प्रकरणी केंद्राकडे तक्रार करण्याचे सुचविले. यानुसार रक्षा खडसे यांच्यासह राधामोहन सिंग यांच्याकडे तक्रार करण्यात आली. यावेळी राधामोहन सिंग यांनी सांगितल्यानंतर संबंधित खात्याकडेही तक्रार करण्यात आली. मात्र, यापुढे चौकशी झाली नाही. यामुळे हे प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप, खडसेंनी केला होता. त्यानंतर खडसे यांनी आता पुन्हा या प्रकरणाला हात घातला असून अ‍ॅड. किर्ती पाटील यांच्या माध्यमातून याप्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. (big name in BHR scam; fir will file within two days says Eknath khadse)

बीएचआर प्रकरणात अकराशे कोटी रूपयांच्या मालमत्ता मातीमोल भावात घेतल्याचे दिसून येत आहे. यात डिपॉजिटच्या रिसीट या ३०-४० टक्के दलालांच्या माध्यमातून घेण्यात येत होत्या. यात अनेक मोठ्या मंडळींनी मालमत्ता घेतल्याची माहिती असून याबाबतचे विवरण हे पोलीस तपासातून समोर येणार आहे, असा दावा खडसेंनी केला होता. हे प्रकरण खूप मोठे असून जवळपास दोन ट्रक इतकी सामग्री जप्त करण्यात आली असून यातून दोषींची अचूक माहिती मिळण्यासाठी तपास हा वेगाने केला तरी जवळपास एक-दोन महिने लागू शकतात, असंही त्यांनी म्हटलंय. (big name in BHR scam; fir will file within two days says Eknath khadse)

 

संबंधित बातम्या:

बीएचआर बँक घोटाळ्याची व्याप्ती अकराशे कोटींची, बड्या मंडळींनी मालमत्ता विकत घेतल्या, एकनाथ खडसेंचा आरोप

खडसेंच्या नव्या प्लॅनमुळे गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार, ‘या’ प्रकरणात कारवाईची शक्यता

(big name in BHR scam; fir will file within two days says Eknath khadse)