मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना (Political Affairs) वेग आलाय. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरू असल्याचीही चर्चा आहे. अशातच पर्यावरणमंत्री (Environment Minister) आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून पर्यावरण मंत्री हे पद हटविलं आहे. त्यामुळं ठाकरे सरकार पडणार का, अशा प्रश्न निर्माण होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राजकीय पेच निर्माण झालाय. शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा दावा केला. एकनाथ शिंदे आणि भाजपनं बहुमत सिद्ध केलं तर उद्धव ठाकरे यांना राजनामा द्यावा लागू शकतो. अशावेळी आदित्य ठाकरे यांच्याकडं पर्यावरण मंत्रीपद राहणार नाही. त्यामुळं कदाचित आताच त्यांनी ट्विटरवरून पर्यावरण मंत्री पद काढलं असावं, असा अंदाज वर्तविला जात आहे.
राज्यपाल कोश्यारींना कोरोनाची लागण झाली. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. राज्यातील संध्याची संपूर्ण परिस्थिती पाहता महाविकास आघाडी सरकार धोक्यात येत असल्याचं चित्र आहे. कनाथ शिंदे यांच्याकडं असलेल्या आमदारांचा आकडा वाढत आहे. दोन तृतियांश पेक्षा अधिक शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेंकडं असल्याचा ते दावा करत आहेत. त्यामुळं शिंदे आपला नवीन गट स्थापन करून भाजपशी हातमिळवणी करतील. राज्यात नवीन सरकार स्थापन करतील, असं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवरून पर्यावरण मंत्री हे पद काढले असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या बोलण्यात कडकपणा दिसला नाही. आमचा व्यवस्थित संवाद सुरू आहे. त्यांचे गैरसमज दूर करण्यात येईल, असं राऊत म्हणाले. शिवसेना पाठीमागून वार करत नसल्याची आठवण त्यांनी करून दिली. यावेळी त्यांनी भाजपला टोमणाही मारला. एकंदरीत राऊतांची देहबोली ही खूप शांत दिसली.