पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा (Bihar Assembly Election) प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष घोषणांचा पाऊस पाडत आहेत. राष्ट्रीय जनता दलाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दलाने तरूणांना डोळ्यांसमोर ठेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे. पाटणा येथे तेजस्वी यादव, मनोज झा यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. मात्र , या जाहीरनाम्यात राष्ट्रीय जनता दलाने 10 लाख नोकर्या देण्याचे जुनेच आश्वासन परत दिले आहे. यामुळे आरजेडीवर आता टीका केली जात आहे. (Bihar Assembly Election 2020 rjd release to tajashwi yadav)
राष्ट्रीय जनता दलाने कोणती आश्वासने बिहारच्या जनतेला दिली?
बिहारमधील तरुणांना सरकारी नोकरीचा अर्ज करताना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.बेरोजगार तरुणांना 1500 रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सरकारी नोकरीत बिहारमधील तरुणांना प्राधान्य देण्यासाठी राज्य सरकार अधिवास धोरण आणेल आणि सरकारी नोकरीत 85 टक्के पदे बिहारमधील तरुणांसाठी राखीव ठेवली जातील. याशिवाय राष्ट्रीय जनता दलाने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे. नवीन उद्योगांसाठी नवीन धोरण आणले जाईल, नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी कोणताही कर लावला जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.
कंत्राटी शिक्षक आणि उर्दू शिक्षक कायमस्वरूपी नियुक्त करण्यात येतील. शेतकरी आयोग, व्यावसायिक आयोग, युवा आयोग व क्रीडा आयोग यांची स्थापना केली जाईल. राज्याच्या जीडीपीचा 22 टक्के भाग शिक्षणावर खर्च होईल. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल.गावे स्मार्ट बनविण्यात येणार असून सीसीटीव्ही बसविण्यात येतील.वयोवृद्ध आणि गरीबांचे पेन्शन प्रतिमहिना 400 रुपयांवरून वाढवून 1000 रुपये प्रतिमाह केले जाईल. मूत्रपिंडाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रूग्णांना विनामूल्य डायलिसिसची व्यवस्था असेल. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये सुरू केली जातील.
बिहार विधानसभा निवडणूक प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मतदानाला आता एक आठवडाही राहिलेला नाही. सत्ताधारी भाजप आणि JDU विरुद्ध काँग्रेस आणि RJDच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली आहे. त्यातच लोक जनशक्ती पार्टीच्या चिराग पासवान यांनी दंड थोपटल्यानं निवडणुकीत अधिकच रंगत आलीय. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आज बिहारमध्ये आमने-सामने आहेत.
उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना कोरोनाची लागण
बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती सुशीलकुमार मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. ‘मागील दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवत होती. कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, कोणतीही अडचण नाही, मागील दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. सध्या पाटणामधील एम्स रुग्णालयात दाखल झालो असून, सीटीस्कॅन रिपोर्ट नॉर्मल आला आहे’, अशी माहिती सुशीलकुमार मोदींनी दिली.
संबंधित बातम्या :
बिहार विधानसभा निवडणुकीतील तीन कट्टर विरोधक एकत्र! काय आहे कारण?
19 लाख 10 लाखापेक्षा मोठे की छोटे? चिदंबरम यांचा बिहारमधील नोकऱ्यांवरुन भाजपला सवाल
बिहारमध्ये पुन्हा NDA सरकार, पंतप्रधान मोदींना विश्वास, RJD आणि काँग्रेसवर सडकून टीका
(Bihar Assembly Election 2020 rjd release to tajashwi yadav)