बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि RJD प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी मुस्लिम आरक्षणाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. बिहारमध्ये लालू-राबडी यांच्या कार्यकाळात जंगलराज होतं, या आरोपावरही पलटवार केलाय. मतदार आमच्याबाजूला आहे. त्यामुळे ते घाबरले आहेत. म्हणूनच जंगलराजच नाव घेऊन जनतेला भडकवत आहेत, असं लालू प्रसाद यादव म्हणाले. त्यांना संविधान संपवायचय. लोकशाही संपवायचीय, असा आरोप लालू प्रसाद यादव यांनी केला. मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे असं देखील लालू प्रसाद यादव म्हणाले.
आरजेडी आणि काँग्रेसला अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि मागास वर्गाच आरक्षण काढून मुस्लिमांना द्यायच आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये निवडणूक सभेत केला होता. लालू प्रसाद यादव यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे असं ते म्हणाले. “माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्या कार्यकाळात मुस्लिमांसह मागास वर्गासाठी आरक्षण सुरु झालं होतं” असं बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कर्पूरी ठाकूर यांचा अपमान करायचा आहे, असं तेजस्वी यादव म्हणाले. “मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू यावर गप्प का? याचं मला आश्चर्य वाटतं” असं तेजस्वी यादव म्हणाले.
सरकारवर काय आरोप केलेले?
याआधी लालू प्रसाद यादव यांनी X वर पोस्ट करुन भाजपावर निशाणा साधला होता. “मोदी सरकार संविधान संपवणार, आरक्षण समाप्त होणार, लोकशाही संपणार, युवा बेरोजगारीने मरणार, सर्वसामान्य महागाईत होरपळणार, पोलीस आणि निमलष्करी दलातही अग्निवीर योजना सुरु होणार, द्वेष आणि विभाजनाला बळ मिळणार” असे लालू प्रसाद यादव यांनी सरकारवर आरोप केले होते.