मोठी बातमी! देशातील एका महत्त्वाच्या राज्यात पुढच्या 24 तासात होऊ शकतो राजकीय भूकंप

| Updated on: Jan 26, 2024 | 2:17 PM

देशातील आणखी एका महत्त्वाच्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुढचे 24 तास महत्त्वाचे आहेत. कुठल्याही क्षणी घोषणा होऊ शकते. या राज्यातील राजकीय घडामोडींचा देशपातळीवरील राजकारणावर दूरगामी परिणाम होऊ शकतात.

मोठी बातमी! देशातील एका महत्त्वाच्या राज्यात पुढच्या 24 तासात होऊ शकतो राजकीय भूकंप
modi shah
Follow us on

नवी दिल्ली | बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुढचे काही तास महत्त्वाचे आहेत. RJD आणि JDU मध्ये मतभेद तीव्र होऊ लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपा आणि जेडीयू मिळून पुन्हा सरकार बनवू शकतात. 28 जानेवारीला राजभवनात शपथग्रहणाचा समारंभ होऊ शकतो. सीएम नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.

पुढच्या 24 तासात नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपासोबत मिळून नवीन सरकार स्थापन केलं जाऊ शकतं. सुशील मोदी यांना उपमुख्यमंत्री बनवलं जाऊ शकतं. “राजकारणात दरवाजे बंद असतात, ते दरवाजे उघडले सुद्धा जाऊ शकतात” असं भाजपा नेते सुशील मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमध्ये एका रॅलीत नितीश कुमार यांच्यासाठी भाजपाचे दरवाजे बंद झालेत, असं म्हणाले होते. त्यानंतर भाजपा नेते असच म्हणत होते की, जेडीयूसोबत आता कुठलीही चर्चा नाही.

बिहार भाजपाचे प्रभारी विनोद तावडे रवाना होणार

बिहारमध्ये जेडीयूसोबत सरकार स्थापन करण्याआधी भाजपाला बिहारचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीसाठी जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा स्तराच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलय. बिहार भाजपाचे प्रभारी विनोद तावडे उद्या सकाळी बिहारला रवाना होतील.

तेव्हाच कळलेल नितीश कुमार मोदींच्या जवळ जात आहेत

माजी मुख्यमंत्री एचएएमचे नेते जीतन राम मांझी यांनी सांगितलं की, “काही दिवसांपूर्वीच मी म्हणालो होतो की, 20 जानेवारीनंतर बिहारमध्ये काही ना काही परिवर्तन होईल” बिहारमधील विद्यमान राजकीय परिस्थितीवर भाजपा नेते नितीन नवीन म्हणाले की, आता केंद्रीय नेतृत्व या बद्दल निर्णय घेईल. काही दिवसांपूर्वी कर्पूरी ठाकुर यांच्या जन्मदिनी मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते की, “आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहोत. त्यावेळीच नितीश कुमार मोदींच्या जवळ जात असल्याचे संकेत मिळाले होते”