मुंबई : सध्या मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या (Yakub Memon) कबरीचा मुद्दा चागलाच गाजत आहे. याकूब मेमनची कबर फुलाने सजवल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरून भाजपकडून (BJP) शिवसेनेला (Shiv Sena) कोंडित पकडण्याचा प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून देखील भाजपावर आरोप करण्यात येत आहेत. आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असतानाच आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर ट्विट करत जोरदार निशाणा साधाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री जनाब उद्धव ठाकरे यांच्या विशेष कृपा प्रसादाचे मानकरी दाऊद टोळीचे मालमत्ता प्रमुख नवाब मलिक यांनीच याकुबच्या कबरीचे प्रकरण दडवल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे.
”मुख्यमंत्री जनाब उध्दव ठाकरे यांच्या विशेष कृपा प्रसादाचे मानकरी दाऊद टोळीचे मालमत्ता प्रमुख नवाब मलिक यांनीच याकुबच्या कबरीचे प्रकरण दडपले होते. उध्दव ठाकरे हे मेमन कुटुंबियांवर एवढे मेहेरबान का होते? वक्फ बोर्डाकडे तक्रार झाल्यानंतरही सरकार अळीमिळी करून का बसले?” असं ट्विट त्यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री जनाब उध्दव ठाकरे यांच्या विशेष कृपा प्रसादाचे मानकरी दाऊद टोळीचे मालमत्ता प्रमुख नवाब मलिक यांनीच याकुबच्या कबरीचे प्रकरण दडपले होते.
उध्दव ठाकरे हे मेमन कुटुंबियांवर एवढे मेहेरबान का होते? वक्फ बोर्डाकडे तक्रार झाल्यानंतरही सरकार अळीमिळी करून का बसले? pic.twitter.com/9go2eXKlJw— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 9, 2022
याच दरम्यान त्यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. त्यांनी या ट्विटमधून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ”जनाब सेनेचा कांगावा उघड झालाय… 2020 मध्ये टायगर मेमनने कब्रस्तानच्या ट्रस्टीला धमकावले होते. परंतु दाऊद टोळीचे माफिया हे राज्याचे वाजिरे आझम जनाब ‘घरंदाज उदौला’ यांचे जावई असल्यामुळे तक्रार करूनही कारवाई झाली नाही. नंतर कबर सजवण्यात आली. तरीही शाहजादे आमच्याकडे बोट दाखवतायत”. असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
जनाब सेनेचा कांगावा उघड झालाय…
२०२० मध्ये टायगर मेमनने कब्रस्तानच्या ट्रस्टीला धमकावले होते. परंतु दाऊद टोळीचे माफिया हे राज्याचे वाजिरे आझम जनाब ‘घरंदाज उदौला’ यांचे जावई असल्यामुळे तक्रार करूनही कारवाई झाली नाही. नंतर कबर सजवण्यात आली. तरीही शाहजादे आमच्याकडे बोट दाखवतायत. pic.twitter.com/qHdrGlcT4a— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 9, 2022