नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. निवडणुकांसाठी आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. सर्वच पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. त्यातच भाजपने (BJP) पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 182 उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील अनेक अपेक्षित मतदारसंघातील उमेदवारांची नावंही जाहीर झाली आहेत.
पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आहे. वाराणसीतून नरेंद्र मोदी लढणार आहेत. तर गांधीनगरमधून अमित शाह आणि नागपुरातून नितीन गडकरी लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे.
महाराष्ट्र
महत्त्वाची नावं :
निवडणुकीच्या तारखा जाहीर :
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.