“हरियाणात काँग्रेसने एकाच समाजाचा विषय केला. त्यानंतर ओबीसी एकत्र आले आणि आम्ही हरियाणात 10 वर्ष काम केलं होतं. विकास केला होता. समाज सोबत आला आणि आमचा विजय सोपा झाला” असं भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणी विनोद तावडे म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. “ज्या पद्धतीने महायुतीने पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट आणि डायरेक्ट बेनिफिट केलं. रस्ते, मेट्रो आणि पंतप्रधान ग्राम सडक योजना आणली. रुग्णांना, विद्यार्थ्यांना मदत झाली. रस्ते बांधल्याचा हा परिणाम झाला. हा इनडायरेक्ट बेनिफिट आणि शून्य वीज बिल, पिक विमा योजना आणि लाडकी बहीण योजना हा डायरेक्ट बेनिफिट मिळणार आहे” असं विनोद तावडे म्हणाले.
“हरियाणात जे घडलं ते विधानसभेला घडेल. लोकसभेत आम्हाला जागा कमी आल्या. फार कमी होत्या. आता एमआयएम, वंचित, समाजवादी पार्टी हे काही मते घेणार आहे. पण महायुतीत अशी मतांची विभागणी होणार नाही. त्यामुळे आमच्या जागा वाढणार आहे. अब की बार 400 पार झालं. मोदी भक्तांनी मतदान केलं नाही. मोदी येणारच आहे, असं म्हणून मतदान झालं नाही. त्यामुळे चार पाच टक्के मतदान कमी झालं. त्याचा फटका बसला” असं विनोद तावडे म्हणाले.
‘उद्धव ठकारेंना वरळीत मुस्लिम मते अधिक पडली’
“वंचित, सपा आणि एमआयएम स्ट्राँग आहेत. त्यांची पाच-दहा हजार मते घेण्याची क्षमता आहे. उद्धव ठकारेंना वरळीत मुस्लिम मते अधिक पडली हे लोकसभेत दिसली. पण अशी मते तिकडे गेल्यावर हिंदुत्वाची मते आमच्याकडे येतात. गेल्यावेळी जो मतदार बाहेर नव्हता पडला. तो वोट जिहाद पाहत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी आपण एकजुटीने उतरलं पाहिजे. हे त्याला वाटत आहे. म्हणून म्हणतो बटेंगे तो कटेंगे. एक है तो सेफ आहे. मोदीही तसं म्हणाले आहेत. आपण एकजूट राहिलो तर आपण सेफ राहू. आम्ही लोकांपर्यंत हे पोहोचवलं आहे” असं विनोद तावडे म्हणाले.