चंदीगड (पंजाब) : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलने काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करत, पंजाबमधील गुरुदासपूर येथील लोकसभेचं तिकीटही मिळवलं. सोमवारी म्हणजे 29 एप्रिल रोजी गुरुदासपूरमधून सनी देओलने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सनी देओलने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रासोबत संपत्तीची माहितीही सादर केली. सनी देओलके नेमकी किती संपत्ती आहे, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
अभिनेता सनी देओलचे खरे नाव ‘अजय सिंह’ आहे. सनी देओलने प्रतिज्ञापत्रात या संबंधी ठळकपणे उल्लेख केला आहे. भारतासह जगभरातील सिनेरसिक मात्र त्याला ‘सनी देओल’ या नावानेच ओळखतात. मात्र, त्याचे खरे नाव वेगळे असल्याचे प्रतिज्ञपत्रातून समोर आले आहे.
निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील संपत्तीच्या विवरणानुसार, सनी देओलकडे 87 कोटी 18 लाख रुपयांची एकूण संपत्ती आहे. सनी देओलची जंगम मालमत्ता 60 कोटी 46 लाख रुपयांची, तर स्थावर मालमत्ता 21 कोटी रुपयांची आहे. तसेच, 50 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचेही सनी देओलने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
वर्षनिहाय उत्पन्न :
सनी देओलकडे 26 लाख रुपयांची, तर पत्नीकडे 16 लाख रुपयांची कॅश आहे. 1 कोटी 69 लाख रुपयांची वाहनं सनी देओलकडे आहेत. मात्र, नेमक्या कोणत्या गाड्या त्याच्याकडे आहेत, याबाबत प्रतिज्ञापत्रातून विस्तृत माहिती देण्यात आली नाही.
पत्नीकडे 1 कोटी 56 लाखांचे दागिने आहेत, मात्र सनी देओलकडे दागिने नाहीत, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
गुरुदासपूरमधून सनी देओल रिंगणात
अभिनेता सनी देओलने काही दिवसांपूर्वीच संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही तासातच सनी देओलला पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीही घोषित करण्यात आली. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना हे गुरुदासपूरमधून भाजपचे खासदार होते.