महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? काँग्रेसचे 22 आमदार भाजपच्या गळाला?; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा काय?

| Updated on: Nov 05, 2022 | 10:18 AM

आतापासून नुकसान होऊ नये म्हणून फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून चेहरा पडलेला असतो.

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? काँग्रेसचे 22 आमदार भाजपच्या गळाला?; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा काय?
काँग्रेसचे 22 आमदार भाजपच्या गळाला?; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद: शिवसेना (shivsena) फुटल्यामुळे राज्यातील सर्वात मोठा राजकीय भूकंप घडला. आता काँग्रेसचे 22 आमदार फुटणार आहेत, असा दावा ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने केला आहे. हा दावा करणारा नेता माजी खासदार आहे. शिंदे गटाचे 16 आमदार बाद होण्याची भीती आहे. त्यामुळे आपली सत्ता जाऊ शकते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी काँग्रेसचे (congress) 22 आमदार तयार ठेवले आहेत. निकाल येताच हे आमदार फुटू शकतात, अशी शक्यताही या नेत्याने वर्तवली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाचे माजी खासदार आणि राज्यातील महत्त्वाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी हा दावा केला आहे. खैरे यांनी औरंगाबादमध्ये एका सभेला संबोधित करताना हा गौप्यस्फोट करून राज्यातील राजकारणात भविष्यात काय होणार आहे याचे संकेत दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्यातील सरकार पडेल म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार आतापर्यंत तयार करून ठेवले आहेत. शिंदे गटाचे 16 आमदार बाद ठरल्यावर सरकार पडू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ही तजवीज करून ठेवली आहे. देवेंद्रजी खूप हुशार आहेत. आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून त्यांनी हे केलं आहे, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

आतापासून नुकसान होऊ नये म्हणून फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत. मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून चेहरा पडलेला असतो. त्यामुळे त्यांचे डावपेच खूप चालू आहेत, असं त्यांनी सांगितलं.

निवडणुका कधी येऊ शकतात काळजी घ्या. राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. राष्ट्रपती राजवट का लागू होऊ शकते सर्वांना माहीत आहे. राज्यपाल कोणतंच काम करत नाही. आपल्या 12 सदस्यांची विधान परिषदेवरही वर्णी लावली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.