पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातलं लोकनियुक्त सरकार पाडणार नाहीत: चंद्रकांत पाटील

| Updated on: Nov 22, 2020 | 7:54 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मला अनादर करायचा नव्हता. त्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, असं सांगतानाच राजकारणात टीका होतंच असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माझ्यावर टीका केलेली कशी चालते?, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. (bjp leader chandrakant patil on maharashtra government)

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातलं लोकनियुक्त सरकार पाडणार नाहीत: चंद्रकांत पाटील
Follow us on

पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मला अनादर करायचा नव्हता. त्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, असं सांगतानाच राजकारणात टीका होतंच असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माझ्यावर टीका केलेली कशी चालते?, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. तसेच पंतप्रधान मोदी लोकनियुक्त सरकार पाडणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (bjp leader chandrakant patil on maharashtra government)

पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा सवाल केला. मी कुणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. शरद पवारांचा अनादर करायचा नव्हता. त्यांना मी नेहमीच आदराने बोलतो. माझ्या वक्तव्याचा संदर्भ समजून घ्या, असं ते म्हणाले. अजित पवारांनी माझ्यावर टीका केली. काही नेते राज्यातील प्रश्नांवर बोलताना दिसले नाहीत. पण माझ्यावर टीका करण्यासाठी त्यांना वेळ मिळाला. हरकत नाही. पवारांना बरं वाटावं म्हणून त्यांना हा विषय चालवायचा असेल तर खुशाल चालू द्या, असा चिमटा त्यांनी काढला.

आम्हाला चंपा, टरबुजा बोललेलं कसं चालतं? पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केलेली कशी चालते?, मी सामान्य माणूस आहे तर मग माझ्यावर टीका कशाला करता? असा सवालही त्यांनी केला. राजकारणात अशा टीका होतंच असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मी अनेकदा टीका करतो. पण त्यावर ते कधी बोलत नाहीत. मी रात गई बात गई, अशा पद्धतीने वागणारा माणूस आहे, असंही ते म्हणाले. मी कोणत्याही ट्रोलिंगला घाबरत नाही, असंही ते म्हणाले.

कन्फ्यूज सरकार

यावेळी त्यांनी ठाकरे सरकारचा कन्फ्यूज सरकार असा उल्लेख करत खिल्ली उडवली. हे सरकार कन्फ्युज आहे. सरकारमध्ये एकमेकांचा पायपोस नाही. गोंधळलेलं सरकार आहे. शाळा सुरू करण्याच्या मुद्द्यावरून हे सरकार मुलांच्या मानसिकतेशी खेळत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

लोकनियुक्त सरकार पाडणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकनियुक्त सरकार कधीच पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यांचा दर्जा वेगळा आहे. ते लोकमताचा आदर करणारे नेते आहेत. त्यामुळे मोदी आणि शहा हे कोणत्याही कारणानं राज्यात राष्ट्रपती राजवट आणून सरकार पाडणार नाहीत. सरकार पडण्याबाबत राज्यातील काही मंत्री काहीही बोलत आहेत. ते का असं बोलत आहेत. ते मला माहीत नाही. त्याबद्दल त्यांनाच विचारा, असा टोलाही त्यांनी हाणला.

…तरच मनसेशी युती

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही भाष्य केलं. राज ठाकरे हे तळमळीने रिअॅक्ट होतात. आमचं परप्रांतियांबाबतचं धोरण ते स्वीकारणार नाहीत. त्यांनी त्यांचं धोरण बदललं पाहिजे. त्यांनी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय मनसेशी युती होऊ शकत नाही, असं सांगतानाच मराठी माणसाला नोकऱ्या मिळायलाच हव्यात. त्याबदल दुमत नाही, असंही ते म्हणाले. (bjp leader chandrakant patil on maharashtra government)

 

संबंधित बातम्या:

पदवीधर निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील सरकार बदलणार, प्रवीण दरेकरांचं मोठं विधान

काही लोक काहीही बरळत आहेत, त्यांना समाजात किंमत आहे का?; अजित पवारांची चंद्रकांतदादांवर खोचक टीका

‘सरकारने ईडब्ल्यूएसचे आरक्षण दिलं नाही तर शिवसंग्राम कोर्टात जाणार’

(bjp leader chandrakant patil on maharashtra government)