कायदा प्रकाश आंबेडकरांच्या बापाची जाहगीर नाही : भाजप नेते गिरीश व्यास

| Updated on: Aug 19, 2019 | 4:46 PM

भाजप नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. भाजपचे नेते आणि प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी कायदा प्रकाश आंबेडकर यांच्या बापाची जाहगीर नसल्याची घणाघाती टीका केली आहे.

कायदा प्रकाश आंबेडकरांच्या बापाची जाहगीर नाही : भाजप नेते गिरीश व्यास
Follow us on

नागपूर : भाजप नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. भाजपचे नेते आणि प्रदेश प्रवक्ते आमदार गिरीश व्यास यांनी कायदा प्रकाश आंबेडकर यांच्या बापाची जाहगीर नसल्याची घणाघाती टीका केली आहे. रविवारी (18 जुलै) प्रकाश आंबडेकर यांनी एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना तुरुंगात टाकण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर व्यास यांनी ही टीका केली.

गिरीश व्यास म्हणाले, “ज्यांचा वारसा मिळाला आहे आणि ज्यांच्यामुळं त्यांचा थोडाफार सन्मान मिळतो आहे, अशा नेत्यांनी असं थिल्लर वक्तव्य करू नये. लोकप्रियता मिळविण्यासाठी कामं करावीत, अशा वक्तव्यांनी लोकप्रियता मिळत नाही.”
प्रकाश आंबडेकर नेमकं काय म्हणाले होते?

प्रकाश आंबडेकर म्हणाले, “कोणाकडे जर बंदूक सापडली, तर त्याला जेलमध्ये जावं लागतं. मग मोहन भागवतांकडेही शस्त्र असतात. तर त्यांना मोकळीक कशासाठी? कायदा सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही जर मला सत्ता दिलीत, तर मी मोहन भागवत यांना दोन दिवसासाठी जेलमध्ये घालेन.” ते औरंगबादमध्ये मुस्लिम समाजाच्या मेळाव्यात बोलत होते.

यापूर्वीही प्रकाश आंबेडकर आणि मोहन भागवत यांच्यात शाब्दिक वाद उफाळला होता. ‘वाघ एकटा असेल, तर जंगली कुत्रे आक्रमण करुन त्याला संपवणारच. आपल्याला हे विसरता कामा नये’ असं मोहन भागवत अमेरिकेत विश्व हिंदू काँग्रेसच्या परिषदेत म्हणाले होते. देशातील विरोधीपक्षांना कुत्रा संबोधल्याचं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी भागवतांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.