Nitin Gadkari : देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नितीन गडकरी म्हणाले…

| Updated on: Oct 25, 2024 | 1:23 PM

Nitin Gadkari : "हा सर्व विकास माझ्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळेंमुळे झालेला नाही. हा नागपूरचा विकास झाला, तो समोर बसलेल्या जनतेमुळे. तुम्ही आशिर्वाद दिला नसता, तुम्ही ताकद दिली नसती, तर आम्ही हे चित्र बदलू शकलो नसतो"

Nitin Gadkari : देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नितीन गडकरी म्हणाले...
Nitin Gadkari
Follow us on

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. उमदेवारी अर्ज भरण्यासाठी निघण्याआधी देवेंद्र फडणवीस यांचं घरी औक्षण करण्यात आलं. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी नितीन गडकरी यांचं छोटेखानी भाषण झालं. “देवेंद्रजींनी महाराष्ट्रात नागपूरच्या विकासाला प्राधान्य दिलं. मला सांगताना आनंद वाटतोय, आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालीत. त्यात काँग्रेसला 60-65 वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली. काँग्रेस जे 60 वर्षात करु शकली नाही, ते महाराष्ट्रात आणि नागपूरमध्ये देवेंद्रजींनी करुन दाखवलं” असं नितीन गडकरी म्हणाले.

“मी तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने नागपूरचा खासदार म्हणून निवडून आलो. मला सांगताना आनंद होतोय, या 10 वर्षात नागपूर शहरात 1 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त काम झाली. यावेळी नागपूरच्या गल्ली-बोळात फिरलो, झोपडपट्टीमध्ये काँक्रीटचे रस्ते बांधलेत. 24 तास पाणी नागपूरमध्ये उपलब्ध आहे, हा सर्व विकास माझ्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रशेखर बावनकुळेंमुळे झालेला नाही. हा नागपूरचा विकास झाला, तो समोर बसलेल्या जनतेमुळे. तुम्ही आशिर्वाद दिला नसता, तुम्ही ताकद दिली नसती, तर आम्ही हे चित्र बदलू शकलो नसतो” असं नितीन गडकरी म्हणाले.

‘ये तो केवल न्यूज रील आहे, असली फिल्म शुरु होना बाकी हैं’.

“आता पुन्हा तुमचा आशिर्वाद मिळाला की, पुन्हा एकदा नागपूरला देशातील सुंदर, स्वच्छ, प्रदूषणमुक्त शहर बनवल्याशिवाय राहणार नाही. मिहान प्रकल्पात आतापर्यंत 78 हजार नागपूरच्या, विदर्भातल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळाला आहे. बाकीच्या नेत्यांना त्यांच्या मुलाबाळांच्या तिकीटाची चिंता आहे. पण आम्हाला नागपूरच्या युवकांच्या रोजागाराची चिंता आहे” असं नितीन गडकरी म्हणाले. “देवेंद्रजींच्या रुपाने महाराष्ट्राचा चित्र बदलू शकणारा नेता नागपूरने महाराष्ट्राला दिलाय” अशा शब्दात नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं.