नवी दिल्ली : बिहारमध्ये (Bihar) नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी भाजपाला (BJP) जोरदार धक्का दिला आहे. नितीशकुमार यांच्या राजकीय खेळीमुळे बिहारमध्ये भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. तर नितीशकुमार यांच्या या खेळीचा सर्वाधिक फायदा हा राजदला झाला आहे. त्यानंतर आता भाजपाच्या नेत्यांकडून नितीशकुमार यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नितीशकुमार यांना रात्री पंतप्रधानपदाचं स्वप्न पडतं. नैतिकतेला फ्रीजमध्ये ठेवून नितीशकुमार पंतप्रधान बनायला चालले आहेत. नितीशकुमार यांना आम्ही पंतप्रधान बनवू शकत नाही. नितीशकुमार बिहारच्या जनतेला मूर्ख समजत आहेत, मात्र जनता सजग आहे. भाजपने नितीकुमार यांना मुख्यमंत्री बनवलं हिम्मत असेल तर त्यांनी पुन्हा निवडणुकांना सामोरे जावं असं आव्हान गिरीजार सिंह यांनी केलं आहे.
दरम्यान मिळत असलेल्या माहितीप्रमाणे आज दुपारी दोन वाजता नितीशकुमार हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार नितीशकुमार यांचे नवे मंत्रिमंडळ हे 35 मंत्र्यांचं असणार आहे. त्यामध्ये आरजेडी 16, जेडीयू 13 आणि काँग्रेसच्या वाट्याला 4 मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे. नितीशकुमार यांनी भाजपाला मोठा झटका दिला आहे. नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन एनडीएमधून बाहेर पडले. आता ते आरजेडी आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार आहेत. आज नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र भाजप नेते त्यांच्यावर टीकेची झोड उठवताना दिसत आहेत.
दुसरीकडे भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपा कार्यकर्त्यांकडून नितीशकुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. नितीशकुमार यांच्या कार्यालयाबाहेर भाजपाच्या वतीने आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनात भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता नितीशकुमार यांच्या कार्यालयाच्या संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. नितीशकुमार यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली असून, हा भाजपासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे.