भाजपामध्ये किरीट सोमय्या नाराज असल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोग संपर्कप्रमुख पदावर न विचारताच माझी नियुक्ती कशी केली? अशी विचारणा किरीट सोमय्या यांनी पक्षाकडे केली. किरीट सोमय्या यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेली पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. या सगळ्या वादावर आता किरीट सोमय्या बोलले आहेत. “मला अनेक कामं दिलेली आहेत. मोठं मोठी काम करत आहे. म्हणूनच मी सुचवलं सगळीच काम मी करतोय, मला कमिटी नको. पक्षाला जे पटलं त्यांनी सुधार केला” असं किरीट सोमय्या म्हमाले.
“कुठल्यातीपरी विषयावर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि किरीट सोमय्या यांचं वेगळ मत असू शकतं. या मुद्यावर माझं वेगळं मत आहे. गेली साडेपाच वर्ष कुठलही पद न घेता, भाजपाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतोय. 18 फेब्रुवारी 2019 रोजी उद्धव ठाकरे अमित शाह यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत यायला तयार नव्हते, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मला पत्रकार परिषदेतून निघून जायला सांगितलं, तेव्हापासून आजपर्यंत मी जीव लावून काम केलय. मला कुठल्याही पदाची गरज नाही हे त्यांना पटलय” असं किरीट सोमय्या म्हणाले.
‘खुन्नस काढण्याचा प्रश्न नाही’
“काम तेवढ्याच जोरात सुरु आहे. नाराजी सोडून द्या. पुन्हा महायुतीच सरकार येणार. उद्धव ठाकरे सरकारने त्यांच्या कार्यकाळात विकास प्रकल्पांची कशी वाट लावली ते जनतेसमोर येणार” असं किरीट सोमय्या म्हणाले. “मी 2019 मध्ये लोकसभेला, विधानसभेला तितकच काम केलं. सोमय्या भाजपाचा सदस्य आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून माफियागिरी केली. खुन्नस काढण्याचा प्रश्न नाही. महाराष्ट्राच्या विकासाची वाट लावली. मी भाजपाच काम करतोय. अधिक जोमाने काम करतोय. कमिटीची अपेक्षा नाही. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता विकासावर विश्वास दाखवेल” असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला.
बावनकुळे यांच्या मुलावर आरोप
“याबाबत कारवाई सुरू झालेली आहे. एफआयआर असो, कोर्टात हा मॅटर आहे. न्यायालयात योग्य निर्णय होईल. संजय राऊतकडे जे पुरावे आहेत, ते त्यांनी द्यावे. आयुष्यात एकदा तरी पुरावे पोलीस स्टेशनमध्ये जावे, FIR नोंदवावा. कोर्टात जावे, 200 आरोप केले एकदा ही ते कुठेही गेले नाहीत लोकांना आता सर्व कळत आहे” असं किरीट सोमय्या म्हणाले.