वादग्रस्त IAS प्रोबेशनर पूजा खेडकर प्रकरणात भाजपा नेत्या, आमदार पंकजा मुंडे यांचं नाव आलय. त्यावर पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलय. “पूजा खेडकर प्रकरणाशी माझा कोणाताही संबंध नाही. खेडकर कुटुंबाने पंकजा मुंडे यांच्या संस्थेला चेक दिल्याच्या बातम्या खोट्या, चुकीच्या आहेत. हा खोडसाळपणा आहे” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलय. “गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला कधी जमलं, तर मी मदत करते, मी पैसे देते. माझ्यावर झालेल्या या आरोपांमुळे मी व्यथित आहे. मी लोकांच्या आनंदात होते. हा आनंद काहींना पहावला नाही” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“एवढ्या मोठ्या व्यक्तीविषयी बोलताना खूप सपोर्ट असला पाहिजे किंवा तुम्हाला मला डॅमेज करायचा असेल. खात्री न करता ही बातमी दिली, हे मी सहन करु शकत नाही. मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावावर कधी एक रुपया घेतलेला नाही. या सगळ्या प्रकरणाचा माझ्याशी काय संबंध?” असा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला.
‘लोकसभेला निवडून येताना माझी स्वत:ची दमछाक’
“मी कधी कुठल्या अशा आर्थिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला नाही. सरकारी टेडेंरमध्ये हस्तक्षेप केला नाही. मी प्रितमची तिकीट टिकवू शकले नाही. लोकसभेला निवडून येताना माझी स्वत:ची दमछाक झाली. असं असताना मी मुख्यमंत्री, प्रधानमंत्रीपेक्षा मोठी आहे का? एका व्यक्तीला बोगसपणे IAS करु शकते. यात लॉजिक आहे का? माझ्याकडे उद्या जरी शक्ती असेल, तरी असं करणार नाही” असं पंकजा मुंडे स्पष्टीकरण देताना म्हणाल्या.
‘कोणत्या अधिकारात मी हे करु शकते’
“हे कोण करतय? यावर पंकजा मुंडे यांनी ‘मला मिळलेली विधान परिषद’ असं उत्तर दिलं. माझ्या कारखान्यांवर जप्ती येतेय. मी स्वत:च्या अडचणीत आहे. कोणत्या अधिकारात मी हे करु शकते. माझं नाव जोडण्याच हे कारस्थान आहे. मी पैसे घेतले हे सिद्ध करुन दाखवाव” असं आव्हान पंकजा मुंडे यांनी दिलं. “मी आता बचाव करणार नाही. आक्रमक राहणार. कायदेशीर पावल उचलणार” हे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. “IAS सारखी एवढी मोठी परीक्षा कोण चुकीच्या पद्धतीने पास होत असेल, तर ते यंत्रणेवर प्रश्नचिन्ह आहे” असं त्या म्हणाल्या.