लेकाला हॉस्टेलवर सोडण्यासाठी पंकजा मुंडे परदेशात, आता 8-10 दिवस फक्त आणि फक्त आर्यमनसोबत!

| Updated on: Aug 31, 2021 | 10:03 AM

उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील बोस्टनला गेलेला मुलगा आर्यमन याच्यासोबत आपण असून 100 टक्के आईच्या रोलमध्ये आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.

लेकाला हॉस्टेलवर सोडण्यासाठी पंकजा मुंडे परदेशात, आता 8-10 दिवस फक्त आणि फक्त आर्यमनसोबत!
पंकजा मुंडेंनी फेसबुकवर शेअर केलेला फोटो
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची अनुपस्थिती जाणवत आहे. “पंकजा कुठे आहे?” असा प्रश्न सर्व जण विचारत असतील, असा अंदाज बांधत खुद्द पंकजांनीच फेसबुकवरुन या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील बोस्टनला गेलेला मुलगा आर्यमन याच्यासोबत आपण असून 100 टक्के आईच्या रोलमध्ये आहे, असंही त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट काय?

“हा आठवडा नक्कीच सर्व जण म्हणत असतील “पंकजा कुठे आहे?”. मी अगदी समर्पित भूमिका बजावत आहे!! आणि भूमिका ती मी नेहमी आवडीने बजावत असते. माझ्या आर्यमनच्या आईच्या रोलमध्ये मी 100 टक्के आहे, किमान पुढचे 8 ते 10 दिवस. आर्यमन आता #Boston मध्ये उच्च शिक्षण घेणार आहे. मी त्याच्या hostel वर त्याला सोडण्यासाठी आले आहे. आर्यमनची 10 वी झाली, 12 वी झाली मी हवा तेवढा वेळ देऊ शकले नाही, 10 वीच्या परीक्षा चालू होत्या, एकeही पेपरसाठी मी उपस्थित नव्हते, तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या. आता लेकरू 4 वर्ष नाही म्हणून संपूर्ण वेळ त्याला देत आहे. म्हणून कशावर काही टिप्पणी न करता बघते आहे राज्याच्या आणि देशाच्या घडामोडी” असं पंकजा मुंडेंनी लिहिलं आहे.

“तरीही इथे देखील घडले असे की मध्य प्रदेशच्या लोकांनी मला डाळ बाटीच्या कार्यक्रमासाठी बोलावले आणि मी प्रभारी असल्यामुळे हक्काने पोहोचले. विदेशी वातावरणात आपल्या जेवणाच्या स्वादाची मजा वेगळीच आहे. त्यांचे देशाच्या विषयी प्रेम आणि काही सेवा करण्याच्या इच्छा पाहून मी प्रभावित झाले. खूप बोलले, अनेक कार्यक्रमही ठरले. शेवटी इथेही नाही म्हणाले तरीही बीजेपीच्या राष्ट्रीय सचिव या भूमिकेत, राजकारणाच्या भूमिकेत आलेच !! पण part time कारण priority आर्यमन आहेच. आज जन्माष्टमी साजरी होत आहे, तिथे जातेय. सर्वांना अभिमान वाटेल असा विषय म्हणजे इथे असणाऱ्या भारतीय लोकांनी स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत त्याबद्दल मध्य प्रदेश मधली 75 गावं smart करण्यासाठी योगदान देण्याचे ठरवले आहे. लहान मुलांनी आपल्या pocket money मधून 75 cents पासून 75 dollar पर्यंत रक्कम रोज 75 दिवस जमा करून स्मार्ट एजुकेशनसाठी गरज असणाऱ्या भारतीय मुलांना laptops किवा smartphone देण्याचा plan तयार केला आहे. अनेक अशा गोष्टी पाहून मी आनंदी झाले, नुसता भारतीय भोजनाचा स्वाद नाही तर देशाच्या अभिमानाचा गोडवाही जिभेवर रेंगाळत आहे. जय हिंद म्हणताना यांचे डोळे चमकताना पाहून माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या पण आनंदाने. माझा आर्यमन एकटा कसा राहील असं वाटत आहे पण इतके पालक मिळाले की हायसे वाटले.” अशा भावनाही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

VIDEO | …तोपर्यंत ना गळ्यात हार घालून घेणार, ना मला कुणी फेटा बांधायचा : पंकजा मुंडे

अमित शहा, जेपी नड्डांना भेटल्यानंतरही पंकजा मुंडे नाराज?; रावसाहेब दानवेंनी केलं मोठं विधान!