BJP | श्रीकांत शिंदे हे ऑथॉरिटी नाहीत, एकवेळ एकनाथ शिंदे यांनी…भाजपा नेता एकदम स्पष्ट बोलला

| Updated on: Mar 13, 2024 | 10:50 AM

BJP | "अमरावतीमध्ये येणारा उमेदवार हा कमळाचाच असेल. उमेदवार राणा असेल किंवा आणखी कोणी असेल तो निर्णय पक्ष घेईल. राणा या उत्तम खासदार आहेत. त्या उमेदवार होऊ शकतात. भाजपमध्ये तर अनेक कार्यकर्ते इच्छुक असतात"

BJP | श्रीकांत शिंदे हे ऑथॉरिटी नाहीत, एकवेळ एकनाथ शिंदे यांनी...भाजपा नेता एकदम स्पष्ट बोलला
CM Eknath Shinde Shrikant Shinde
Follow us on

अमरावती (स्वप्निल उमप) : “बैल गेला आणि झोपा केला…जेव्हा उद्धव ठाकरेंनी फिरायला पाहिजे होतं, तेव्हा ते घरात बसले. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मातोश्री मधून बाहेर पडले नाहीत. जेव्हा शिवसैनिकांशी संवाद साधायला पाहिजे होता तेव्हा साधला नाही. अख्खी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या सोबत गेली, तेव्हा त्यांना जाग येते. परंतु आता जाग येऊन त्यांच्या हाताला काहीच लागणार नाही” अशा शब्दात भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ-वाशिम दौऱ्यावर खोचक टीका केली. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी काल नाशिकमधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. त्या बद्दल प्रवीण दरेकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “श्रीकांत शिंदे हे ऑथोरिटी नाहीत, एकवेळ एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं असत, तर आपल्याशी बोललो असतो. तिन्ही पक्षाच्या सुसंवादातून एकत्र निवडणूक होईल. कुठेही विसंवाद होणार नाही. ज्या जागा त्यांना वाटतात, त्या जागा ते मागतायत. ज्या जागा योग्य असतील त्या त्यांना मिळतील”

भाजपा मुंबईत पाच जागांवर लढू शकते. या मुद्यावर प्रवीण दरेकर म्हणाले की, “आमचा मोठा पक्ष आहे. 48 लोकसभा मतदारसंघात आमचे कार्यकर्ते काम करतात. जशी त्यांना उमेदवारी पाहिजे असते, तशी आमच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी दिली पाहिजे असं वाटतं”. “आमच्या भारतीय जनता पार्टीला झुकतं माप असेलच. लोकसभेला व्यवस्थित झालं की विधानसभेतही व्यवस्थित होईल” असं दरेकर म्हणाले. “बच्चू कडू यांनी पंतप्रधान पण आम्हीच बनवला हे बोलले नाही म्हणजे नशीब. महायुतीमध्ये विसंवाद होईल अशा प्रकारचे वक्तव्य बच्चू कडू यांनी करू नये” “असे वक्तव्य करणे बच्चू कडू यांच्या हिताचे नाही. बच्चू कडूना काही बोलायचं असेल, तर त्यांनी चार भिंतीच्या आत बोलावं” असं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी बच्चू कडूंना सल्ला दिला.

नवनीत राणा कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार का?

“आमच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह आहे, की अमरावती लोकसभेमध्ये कमळाच्या चिन्हावरच निवडणूक झाली पाहिजे. या ठिकाणी कमळ फुलले पाहिजे. अमरावतीमध्ये येणारा उमेदवार हा कमळाचाच असेल. उमेदवार राणा असेल किंवा आणखी कोणी असेल तो निर्णय पक्ष घेईल. राणा या उत्तम खासदार आहेत. त्या उमेदवार होऊ शकतात. भाजपमध्ये तर अनेक कार्यकर्ते इच्छुक असतात. पण राणांची इच्छा जर भाजपमध्ये येऊन लढायची असेल तर लढले पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह आहे की अमरावती लोकसभेमध्ये कमळाच्या चिन्हावरच निवडणूक झाली पाहिजे” असं प्रवीण दरेकर म्हणाले.