भोपाळ : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नसून भगवान रामाच्या विरोधात आहे, अशी टीका भाजप नेत्या उमा भारती यांनी केली. पवारांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला होता. (BJP Leader Uma Bharti criticises Sharad Pawar statement on PM Modi and Ayodhya Temple)
“शरद पवार यांचे हे वक्तव्य रामद्रोही आहे. ते पंतप्रधान मोदींच्या विरोधात नसून भगवान राम यांच्याविरोधात आहे.” असं उमा भारती म्हणाल्या. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी गणपतीची पूजा करण्यासाठी त्या भोपाळमधील प्राचीन गणेश मंदिरात गेल्या होत्या.
“आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं” असा टोला लगावत पवारांनी मोदी सरकारला आर्थिक नुकसानाकडे प्राधान्याने लक्ष देण्याचा सल्ला काल सोलापूर दौऱ्यात दिला होता.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान ओली यांना भगवान राम यांचा जन्म नेपाळमध्ये झाला, असे वाटत असेल तर त्यांनी तिथे राम मंदिर बांधावे आणि त्याची पायाभरणी करावी” असे उत्तरही उमा भारती यांनी दिले.
This statement is against Lord Ram, not against PM Modi: BJP leader Uma Bharti on NCP leader Sharad Pawar’s remark, ‘We are thinking of how to fight #Coronavirus while some people think that corona will go by building a temple’ pic.twitter.com/zUGR1rkI6t
— ANI (@ANI) July 20, 2020
शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर दोन गट पडल्याचे चित्र आहे. पवार समर्थकांनी शरद पवार यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. तर काही जणांनी पवारांच्या वक्तव्यावर टीकाही केली आहे. त्यानंतर #SharadPawar काही काळ ट्विटरवर ट्रेंडमध्ये होते.
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरे राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार का? संजय राऊत म्हणतात…
सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप नाही, सोलापूरशी ऋणानुबंध असल्याने दौरा : शरद पवार
(BJP Leader Uma Bharti criticises Sharad Pawar statement on PM Modi and Ayodhya Temple)