बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, भाजप नेते अतुल भातखळकरांच्या सचिन सावंतांना कोपरखळ्या

| Updated on: Sep 29, 2020 | 5:10 PM

बिहारमध्ये काँग्रेसचे लोक स्वत: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करत होते.

बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, भाजप नेते अतुल भातखळकरांच्या सचिन सावंतांना कोपरखळ्या
Follow us on

मुंबई : सुशांत सिंह प्रकरणावरुन राजकीय दंगल सुरुच आहे (Atul Bhatkhlkar Criticize Sachin Sawant). आज सुशांतचा विसेरा रिपोर्ट आला. त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली. त्याला आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना”, असं म्हणत त्यांनी सचिन सावंत यांच्यावर टीकास्त्र सोडलं (Atul Bhatkhlkar Criticize Sachin Sawant).

“एस्मचा अहवाल आल्यानंतर सचिन सावंत म्हणाले की भाजपला झटका बसला आहे. मला कळत नाही की त्यांना एम्सचा अहवाल कोणी सांगितला”, असं अतुल भातखळकर म्हणाले.

“बिहारमध्ये काँग्रेसचे लोक स्वत: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करत होते. त्यामुळे ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ असी परीस्थिती काँग्रेस प्रवक्त्यांची झाली आहे”, असं म्हणत भातखळकरांनी सचिन सावंत यांना उत्तर दिलं. तसेच, सुशांत सिंह राजपूत प्रकरमणात ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल असंही त्यांनी म्हटलं.

सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट सीबीआयकडे सुपूर्द

सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी एम्सच्या विशेष पथकाने आपला अहवाल सीबीआयकडे सादर केला आहे. या व्हिसेरा (Viscera) रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूतवर कोणत्याही प्रकारचा विषप्रयोग करण्यात आला नव्हता. त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विषकण आढळले नसल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. सुशांतचा व्हिसेरा (Viscera) रिपोर्ट AIIMSकडून सोमवारी (28 सप्टेंबर) सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला (Atul Bhatkhlkar Criticize Sachin Sawant).

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्याने, त्याच्यावर विषप्रयोग केला गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या तपासाकरिता AIIMSच्या डॉक्टरांचे एक विशेष पथक नेमण्यात आले होते. याच विशेष पथकाने सुशांतचा व्हिसेरा रिपोर्ट सादर केला आहे.

Atul Bhatkhlkar Criticize Sachin Sawant

संबंधित बातम्या :

Sharad Pawar | सुशांत प्रकरणात CBI ने काय दिवे लावले?, शरद पवारांचा सवाल