सांगली : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर हल्ल्यांची मालिका सुरुच ठेवलीय. राष्द्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आल्यापासून हे सरकार बहुजनांच्या आरक्षणाच्या मुळावर उठलं असल्याचा घणाघात पडळकर यांनी केलाय. तसंच शरद पवार यांच्या घरी चाकरी करणारा आणि पदोन्नती आरक्षण संपवणारा, सरकारी वकील कोण? असा सवालही पडळकर यांनी केलाय. पडळकर यांनी यापूर्वीही मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन थेट शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला आहे. (Gopichand Padalkar criticize Sharad Pawar and Thackeray government)
महाविकास आघाडी सरकार मराठा, धनगर, ओबीसी आणि पदोन्नती आरक्षण देण्यात अपयशी ठरलं आहे. या सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही, असा गंभीर आरोपी पडळकर यांनी केलाय. शरद पवार यांच्या घरी चाकरी करणारा आणि पदोन्नती आरक्षण संपवणारा, सरकारी वकील कोण? असा प्रश्न उपस्थित करत पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधलाय.
काँग्रेसचे मंत्री लाचार आहेत. सोनिया गांधी यांनी सरकारला राज्यातल्या मागासवर्गीय,अनुसूचित जातींच्या हक्काचं संरक्षण करण्याचं पत्र पाठवलं आहे. मात्र याठिकाणी अन्याय होत असताना काँग्रेसचे मंत्री सत्तेला चिकटून बसलेले आहेत, अशी टीकाही पडळकर यांनी केलीय. तसंच याबाबत आपण सोनिया गांधींना पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
न्यायालयाच्या निर्णयाआधीच आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी या बहुजनद्वेष्ट्या सरकारची किती लगबग चाललीये आणि सत्तेची वेसन घातलेले कॉंग्रेसचे लाचार मंत्री मात्र काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलवतायेत. मी लवकरच माननीय सोनिया गांधींना तुमचे मंत्री pic.twitter.com/ZdCsgIe1Hx
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) June 4, 2021
शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापित झालेलं आघाडी सरकार किती बहुजनद्वेष्टं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. या सरकारला मराठा आरक्षणाविषयी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी व पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात कुठलेही पाऊल उचलण्याची घाई नाहीये. पण न्यायालयाच्या निर्णयाआधीच आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग उडाली आहे. यावरून या सरकारची मानसिकता दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला आहे. ‘सगळं गावच करील तर सरकार काय करील? ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला असताना, त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी त्यांच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा कशी सुचतेय असा सवाल पडळकरांनी केला आहे. यावेळी पडळकरांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना थेट टार्गेट केलं.
गोपीचंद पडळकर म्हणाले, “आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोव्हिड आणि लॅाकडाऊनमुळे पूर्णपणे मोडला आहे. घरातील कित्येक कर्ती माणसं मृत्यूमुखी पडलीत. यांचे अश्रू पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा सुचतेय”.
संबंधित बातम्या :
राज्य सरकारकडून कोरोनामुक्त गाव स्पर्धा, पहिल्या गावाला मिळणारी बक्षीस रक्कम तब्बल…
तुमचे मंत्री काका-पुतण्यापुढे लाचार; गोपीचंद पडळकर सोनिया गांधींकडे तक्रार करणार
Gopichand Padalkar criticize Sharad Pawar and Thackeray government