“मी आज एक आमदार म्हणून नाही, तर हिंदू म्हणून तुम्हाला ताकद देण्यासाठी आलोय. आपण काय करतोय, फक्त घोषणा देत बसायचं. जेव्हा एखादी घटना घडते, तेव्हा कोण आगे बढ बोलत नाही. आम्ही काय करणार नाही, फक्त मोर्चे काढत बसणार. तुमच्या उल्हास नगरमध्ये आज काय चालले आहे, हे काय तुम्हाला माहित नाही” असं भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले. “सलीम अन्सारी, बाबा अन्सारी हा आज जिवंत का आहे?. मी आज त्या पीडित कुटुंबाची भेट घेतली. आज त्या कुटुंबाची व्यथा मी ऐकली. त्या मुलीच्या कुटुंबाला तिचे वडील भेटायला गेले तर पोलीस सांगतात तुम्हाला भेटता येणार नाही. पोलिसांना मी सांगेन हे सरकार कुणाचे आहेत गृह मंत्री कुणाचे आहेत” असं नितेश राणे म्हणाले.
“पोलिसांना मी सांगेन, तुम्हाला जमत नाही तर एक दिवसाची सुट्टी घ्या आणि हिंदूंच्या हातात द्या. नाही, जर ह्या हिरव्या सापांना मारले तर बघा. त्या मुलीच्या घरी ते हिरवे साप आले आणि त्यांनी तिच्या घरातील मंदिर जाळून टाकले. आज हिंदू म्हणून जागृत राहिला नाही तर तुम्ही पूजा देखील करू शकणार नाही” असं नितेश राणे म्हणाले. “आज हिदू संघटित झाले, त्यामुळे पोलिस फोर्स लावावी लागली. तुम्ही तीन चार तास एकत्र आलात तर या पोलिसांची हवा टाईट झाली” असं नितेश राणे म्हणाले.
‘एका घरात चाळीस चाळीस बांग्लादेशी कसे राहतात?’
“तुमच्या उल्हास नगरमध्ये एकही जिहादी सापडणार नाही. पोलिसांनो तुम्हाला हे बिर्याणी वाले, वाचवायला येणार नाही. तुम्ही बुलडोझर नाही चालवला, तर देवा भाऊचा बुलडोझर चालेल” असं नितेश राणे म्हणाले. “मिरा रोडमध्ये एकदा बुलडोझर चालला, आता ढुंगण पण वर काढत नाही. पोलिसांनो तुम्हाला एक सांगतो हे जिहादी तुमचे कधी होणार नाहीत. आझाद मैदान येथे रझा अकादमी यांनी काय केले ते आठवा. काल नाशिकमध्ये काय झाले. हिरवे वळवळयाला लागले, त्यांना आपल्या हिंदुंनी ताकद दाखवली. दगडफेक त्यांनी केली पण आपल्या लोकांनी जे उत्तर दिले, त्यामुळे आता त्यांना त्यांचा अबू देखील आठवणार नाही. उल्हास नगर मध्ये एका घरात चाळीस चाळीस बांग्लादेशी कसे राहतात?” असा सवाल नितेश राणेंनी केला.