राम कदम यांच्याकडून काशी यात्रेसाठी मोफत ट्रेन, तीन हजार जणांना घडवणार दर्शन

| Updated on: Jan 07, 2023 | 10:47 AM

रेल्वेत यात्रेला जाणाऱ्या जेष्ठांच्या सुविधासाठी मोठी तयारी केली आहे. त्यांच्या खाण्यापिण्यापासून आरोग्यपर्यंत काळजी घेतली जात आहे. ट्रेनमध्ये २२ डॉक्टरांचा ताफाही सोबत ठेवला आहे.

राम कदम यांच्याकडून काशी यात्रेसाठी मोफत ट्रेन, तीन हजार जणांना घडवणार दर्शन
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम (bjp mla ram kadam)यांनी अनोखा उपक्रम सुरु केला आहे. घाटकोपरमधील हजारो वृद्ध-आई वडिलांना त्यांनी काशीत भगवान विश्वनाथचे दर्शन घडवलंय. श्री काशी विश्वनाथ धाम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या लोकार्पण (kashi vishwanath corridor) केले. त्याठिकाणी 339 कोटी खर्च करून तयार करण्यात आलेल्या काशी विश्वानाथ धामच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण वर्षभरापुर्वी करण्यात आले होते. हे नवीन काशी दाखवण्यासाठी व भाविकांना भगवान विश्वनाथचे दर्शन घडवण्यासाठी आमदार राम कदम मोफत काशी यात्रेचे आयोजन करत आहे. आतापर्यंत त्यांनी सात ट्रेनने घाटकोपरमधील भाविकांना काशीला नेले होते. शनिवारी ७ जानेवारी रोजी तीन हजार भाविकांची आठवी ट्रेन काशीला निघाली. या ट्रेनला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिरवी झेंडी दाखवली. नारायण राणे यांनी यात्रेकरुंना शुभेच्छा दिल्या. त्यांनी राम कदम यांच्या उपक्रमाचे कौतूक केले. राम कदम तीन हजार आई-वडिलांना घेऊन दर्शनास जात आहे. ते पुण्याचे काम करत आहे. आपणही कोकणात राम कदम यांचे अनुकरण करणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

यावेळी आमदार राम कदम यांनी आपण घाटकोपरमध्ये राहणाऱ्या सर्व आई-वडिलांना ही काशी यात्रा घडवणार असल्याचे सांगितले. आतापर्यंत हजारो जणांनी या यात्रेचा लाभ घेतला आहे. घाटकोपर पश्चिममध्ये आता खूप कमी लोक असतील ज्यांनी काशीत जाऊन भगवान विश्वनाथचे दर्शन घेतले नाही.

हे सुद्धा वाचा

भाविकांसाठी रेल्वेत मोठ्या सुविधा

रेल्वेत यात्रेला जाणाऱ्या जेष्ठांच्या सुविधासाठी मोठी तयारी केली आहे. त्यांच्या खाण्यापिण्यापासून आरोग्यपर्यंत काळजी घेतली जात आहे. ट्रेनमध्ये २२ डॉक्टरांचा ताफाही सोबत ठेवला आहे. ज्येष्ठ मंडळींचे हातपाय दाबण्यापासून सर्व काळजी आरोग्य पथक घेणार आहे.येत्या श्रावण महिन्यात जटाधारी संतांची यात्रा काढणार असल्याचे आमदार राम कदम यांनी टीव्ही९ शी बोलताना सांगितलं.