भाजपच्या’ त्या’ 12 आमदारांना विधानभवनात प्रवेश मिळणार? आमदार आशिष शेलारांचं विधानभवन सचिवांना पत्र

| Updated on: Jan 31, 2022 | 6:56 PM

महाराष्ट्र विधानसभेने भाजपाच्या 12 आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन हे सर्वोच्च न्यायालयाने अवैध, घटनाबाह्य व अतार्किक ठरवून रद्द केले आहे. विधानभवन सचिवांना तसं पत्र लिहून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी याबाबत त्यांना अवगत केलं आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे या आमदारांना विधानभवनात प्रवेश खुला झाल्याकडेही त्यांनी सचिवांचे लक्ष वेधले आहे.

भाजपच्या त्या 12 आमदारांना विधानभवनात प्रवेश मिळणार? आमदार आशिष शेलारांचं विधानभवन सचिवांना पत्र
आशिष शेलार, आमदार, भाजप
Follow us on

मुंबई : विधानसभेत तालिका अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्याच्या कारणावरुन भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन (BJP MLA Suspension) करण्यात आलं होतं. त्यानंतर या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने 12 आमदारांना मोठा दिलासा देत त्यांचं निलंबन रद्द केलं आहे. त्यानंतर आता या 12 आमदारांना विधान भावनात प्रवेश मिळाला या मागणीसाठी आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विधानभवन सचिवांना (Legislative Secretary)पत्र पाठवलं आहे. महाराष्ट्र विधानसभेने भाजपाच्या 12 आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन हे सर्वोच्च न्यायालयाने अवैध, घटनाबाह्य व अतार्किक ठरवून रद्द केले आहे. विधानभवन सचिवांना तसं पत्र लिहून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी याबाबत त्यांना अवगत केलं आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे या आमदारांना विधानभवनात प्रवेश खुला झाल्याकडेही त्यांनी सचिवांचे लक्ष वेधले आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या 12 आमदारांना 1 वर्षांसाठी निलंबित केल्याच्या विरोधात 12 आमदारांतर्फे आमदार आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निकाल 28 जानेवारीला दिला असून सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे निलंबन अवैध ठरवून रद्द केले आहे. आज याबाबत 12 आमदारांच्या वतीने भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सविस्तर कायदेशीर माहिती सचिवांना अवगत केली असून सोबत निवाड्यांची प्रत ही जोडली आहे. न्यायालयाने निलंबन रद्द केल्यामुळे यापुढे विधिमंडळाच्या मुंबई आणि नागपूर येथील विधानभवन परिसरात प्रवेशाचा आमचा मार्ग मोकळा केला आहे, याकडे विधानसभा सचिवालयाचे लक्ष वेधले आहे.

भाजपच्या 12 आमदारांना विधानभवनात प्रवेश मिळणार?

1. अतुल भातखळकर
2. राम सातपुते
3. आशिष शेलार
4. संजय कुटे
5. योगेश सागर
6. किर्तीकुमार बागडिया
7. गिरीश महाजन
8. जयकुमार रावल
9. अभिमन्यू पवार
10. पराग अळवणी
11. नारायण कुचे
12. हरीश पिंपळे

नेमकं अधिवेशनात काय घडलं?

विधानसभेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ झाला होता. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. त्यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो. मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही? असा सवाल भुजबळ यांनी केला होता. त्यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला होता. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितलं. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले होते.

भाजपच्या आक्रमक आमदारांनी अध्यक्षांच्या समोरी हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गदारोळात धक्काबुक्की झाली. यावेळी भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांना शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सभागृहाचं वातावरण अधिकच तापलं होतं.

इतर बातम्या :

VIDEO: तर तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात बसणार नाही; भास्कर जाधवांची मोठी घोषणा

Ravi Rana | ‘ठाकरे सरकारनं 12 आमदारांचं निलंबन करून लोकशाहीची हत्या केली होती’

भाजपचे 12 आमदार निलंबित, नागपुरात पडसाद, बावनकुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पुतळे जाळले