मुंबई : एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजप (BJP) आमदारांना मुंबई (Mumbai) येण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. तर यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. ही सत्तास्थापनेची भाजपकडून तयारी तर सुरू नाहीय ना, असाही प्रश्न सध्या चर्चेत आहे. दरम्यान, आतापर्यंत संख्याबळाचं समीकरण जुळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं होतं. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असणं गरजेचं होतं. 37 हा आकडा एकनाथ शिंदे यांना गाठायचा होता. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे 40 आमदार असल्याचं म्हटलंय. यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदेंचा गट सत्तास्थापनेची तयारी तर करत नाहीये ना, असाही प्रश्न सध्या चर्चेत आहेत. यामुळे राज्यात आता येत्या काळात काय घडामोडी होतात, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे चाळीस आमदार असल्याचा दावा खुद्द त्यांनीच केला आहे. त्यामुळे राज्यात येत्या काळात मोठ्या घडामोडी घडू शकता. तर दुसरीकडे भाजपकडे देखील मोठ संख्याबळ आहे. आतापर्यंत संख्याबळाचं समीकरण जुळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं होतं. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असणं गरजेचं होतं. 37 हा आकडा एकनाथ शिंदे यांना गाठायचा होता. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे 40 आमदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा हादरा बसलाय. सत्तास्थापनेचा भाजपसोबत दावा एकनाथ शिंदे करतील, अशी शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुठल्या जिल्ह्यातले किती आमदार त्यांच्यासोबत आहे. शिंदेंकडे किती संख्याबळ आहे, हे जाणून घेऊय…
ठाणे जिल्हा (7 आमदार)