जळगाव : केळी पीक योजनेच्या नुकसान भरपाईचे निकष बदल करण्याचे श्रेय मी घेत नाही. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी माझ्यावर टीका न करता मुलीने चांगले काम केले म्हणून प्रोत्साहन द्यायला हवे, असा खोचक टोला भाजप खासदार रक्षा खडसे यांना लगावला. (BJP MP Raksha Khadse criticizes Water Supply Minister gulabrao patil on Changes in banana crop insurance criteria)
केळी पीक विम्याचे निकषात बदल
केळी पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यावरून केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडी यांच्यात श्रेय घेण्यावरुन वाद सुरु झाला आहे. याच वादातून राज्याचे पाणी पुरवठा योजना मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यात चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळाला.
रक्षा खडसे लग्न दिसले की वाजा घेऊन हजर होतात
हवामानावर आधारित फळपीक विम्याचे निकष राज्य शासनाने बदलले. पण भाजप खासदार रक्षा खडसे या केंद्राने निकष बदलल्याचा खोटा दावा करीत आहेत. कुठे लग्न दिसले की आपला वाजा घेऊन त्या ठिकाणी वाजविण्यास त्या हजर होतात, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. या टीकेला रक्षा खडसे यांनीही शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले.
मी कोणतेही श्रेय घेतले नाही
“मी गेल्या अनेक दिवसांपासून मुलांसोबत बाहेरगावी होते. याबाबत मी कोणतेही श्रेय घेतले नाही. माझे कुठेही वक्तव्य नाही. यामध्ये कोणाचेही श्रेय नाही. आम्ही फक्त शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. त्यामुळे राज्य सरकारला निकष बदलावे लागेल,” असे रक्षा खडसेंनी सांगितले.
गुलाबराव पाटलांनी प्रोत्साहन देण्याची गरज
“मात्र यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माझ्यावर टीका करावी याचे मला आश्चर्य वाटत आहे. ते मला वडिलांसारखे आहेत. उलट मुलगी म्हणून त्यांनी या मुद्द्यावर चांगले काम केल्याने माझे कौतुक करुन प्रोत्साहन देण्याची गरज होती,” असे रक्षा खडसे म्हणाल्या.
नाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळhttps://t.co/fZEGr2zRBh#ChhaganBhujbal #Nashik #CoronaUpdates @ChhaganCBhujbal
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 24, 2021
(BJP MP Raksha Khadse criticizes Water Supply Minister gulabrao patil on Changes in banana crop insurance criteria)
संबंधित बातम्या :
‘नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली’, नाना पटोलेंचा पुन्हा मोदींवर हल्लाबोल
मराठा समाजाला 3 हजार कोटींचे, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचे पॅकेज द्या, भाजपची मागणी