Shaina NC : ‘माल बोलल्याने शायना एनसी यांचा संताप’, शिवसेनेच्या खासदाराला फटकारलं, VIDEO

| Updated on: Nov 01, 2024 | 10:51 AM

Shaina NC : "राजकारणात सक्षम असलेल्या महिलेला माल संबोधलं. त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही" असं शायना एनसी म्हणाल्या. शायना एनसी या भाजपाच्या उमेदवार आहेत. अनेक वर्षांपासून त्या राजकारणात सक्रीय आहेत. भाजपाने त्यांना मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

Shaina NC :  माल बोलल्याने शायना एनसी यांचा संताप, शिवसेनेच्या खासदाराला फटकारलं, VIDEO
Follow us on

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार शायना एनसी यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्या शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आल्या होत्या. राज ठाकरेंना भेटल्यानंतर त्यांनी माडियाशी संवाद साधला. शायना एनसी यांनी उपस्थित पत्रकारांना एक क्लिप ऐकवत अरविंद सावंत यांच्यावर टीका केली. अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईचे खासदार आहेत. अरविंद सावंत यांनी माल संबोधल्याने शायना एनसी यांनी संताप व्यक्त केला.

“बाहेरचा माल चालणार नाही. मुंबादेवीमध्ये इथलाच माल चालणार, अमिन पटेल” अस अरविंद सावतं म्हणाले. त्यांच्या ‘माल’ या शब्दावर शायना एनसी यांनी संताप व्यक्त केला. पत्रकारांना व्हिडिओ क्लिप दाखवत शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्यावर आरोप केला. अरविंद सावंतांनी माल शब्दाचा वापर करत संबोधल असं शायना एनसी म्हणाल्या आहेत. “राजकारणात सक्षम असलेल्या महिलेला माल संबोधलं, यांची मानसिक स्थिती ठीक नाही” असं शायना एनसी म्हणाल्या.

‘त्यांना विचार ते कुठले आहेत?’

“हे तेच अरविंद सावंत आहेत, ज्यांच्यासाठी मी प्रचार केला. आमच्या बळावर निवडून आले. त्यांना विचारा ते कुठले आहेत?. मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईची लाडली आहे. मुंबईसाठी काम करणार. मला अरविंद सावंत आणि उबाठाच्या प्रमाणपत्राची गरज नाही” असं शायना एनसी यांनी ठणकावलं.

‘माल बोलाल, तर हाल होणार’

“महिलेला माल म्हणून तुम्ही बघता. एक सक्षम महिला, प्रोफेशनल 20 वर्ष स्वबळावर काम करुन पुढे आली आहे. तुम्ही तिच्यासाठी माल सारखे शब्द वापरता. तुमची मानसिक स्थिती त्यातून सगळ्यांना कळते. महाराष्ट्रातील महिला उबाठाला मतदान करणार नाही. महिलांचा सन्मान केला, तर आदर आहे. महिलांना माल बोलवलं, तर तुमचे जे हाल होणार ते 20 तारखेला बघा” असं शायना एनसी म्हणाल्या.

राज ठाकरेंच्या भेटीवर काय म्हणाल्या?

राज ठाकरेंची भेट घेतली, त्याबद्दल त्या म्हणाल्या की, “राज ठाकरेंसोबत आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही”