मुंबई – महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार असे आतापर्यंत राज्यातील भाजपा नेत्यांकडून बोलले जात होते. मात्र आता खुद्द भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आज सकाळी मुंबईमध्ये आगमन झाले त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये भाजपाची सत्ता येणार असून, आम्ही महाविकास आघाडी सरकार उलथून टाकू असे त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान जेपी नड्डा यांचे आज सकाळी मुंबई विमानतळावर आगमन झाले. नड्डा विमानतळावर येताच राज्य भाजपाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. स्वागत समारंभ पार पडण्यानंतर जेपी नड्डा हे ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडे निघाले आहेत. मुंबईमध्ये आसाममधील भाजपा आमदारांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून, उद्या नड्डा यांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जेपी नड्डा हे भाजपाच्या नेत्यांना संबोधित करतील.
दरम्यान महाविकास आघाडी सरकार हद्दपार करू, असे वारंवार राज्यातील भाजपा नेत्यांकडून ऐकायला मिळते. मात्र आता खुद्द भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी देखील हद्दपारीची भाषा केल्याने, राजकीय वर्तृळात चर्चेला उधान आले आहे. मात्र दुसरीकडे आमचे सरकार स्थिर असून, पुढील निवडणुकीपर्यंत आम्हीच सत्तेत राहाणार असल्याचे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री सांगत आहेत.
Rousing welcome of BJP National President Shri @JPNadda on his arrival in Mumbai, Maharashtra. pic.twitter.com/W227fKqYej
— BJP (@BJP4India) November 11, 2021
संबंधित बातम्या
पिकांचे भाव माहित नाहीत; गांजा किती रुपयांना मिळतो हे बरोबर ठावूक असते, विखेंचा मलिकांवर निशाणा
Salman Khurshid Book Controversy:”हिंदुत्वाची तुलना ISIS शी करणं चुकीचं”- गुलाम नबी आझाद