अहमदनगरमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांविरोधात कार्यकर्ते आक्रमक, 310 पैकी 257 बुथप्रमुखांचा राजीनामा

| Updated on: Oct 31, 2020 | 8:28 PM

भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारला आहे (BJP party workers nervous on party district president in Ahmednagar).

अहमदनगरमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांविरोधात कार्यकर्ते आक्रमक, 310 पैकी 257 बुथप्रमुखांचा राजीनामा
Follow us on

अहमदनगर : भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भाजपाच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर या सर्व सदस्यांनी संचालन समिती स्थापन करत वेगळी चूल मांडली आहे (BJP party workers nervous on party district president in Ahmednagar).

राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत आज (31 ऑक्टोबर) श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. “जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर पक्षाचे ध्येयधोरणे न राबवता मनमानी कारभार करत करतात”, अशी टीका कार्यकर्त्यांनी केली.

हेही वाचा : …तर अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वबळावर लढू; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

श्रीरामपूर तालुक्यासह परिसरातील 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला आहे. श्रीरामपूर शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात आज सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाध्यक्षांवर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी संचालन समितीची स्थापना केली आहे. जिल्हाध्यक्षांचा कोणताही निर्णय ही समीती मान्य करणार नसल्याची भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे (BJP party workers nervous on party district president in Ahmednagar).

हेही वाचा : युवासेनेच्या विक्रम राठोड यांची विधान परिषदेवर नियुक्ती करा; नगरच्या कार्यकर्त्यांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र